Advertisement

'ह्या' 5 वॉर्डमध्ये 2 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण

मुंबईत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या 5 वॉर्डमधील कोरोना रुग्णसंख्या 2 हजाराहून अधिक आहे.

'ह्या' 5 वॉर्डमध्ये 2 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण
SHARES

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर महाराष्ट्रात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या 5 वॉर्डमधील कोरोना रुग्णसंख्या 2 हजाराहून अधिक  आहे. 

मुंबईतील जी उत्तर वॉर्ड हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरला आहे. या विभागातील धारावी, दादर, माहिममध्ये रोज रुग्णसंख्या वाढत आहे. मंगळवारी धारावीत कोरोनाच्या ३८ रूग्णांची वाढ झाली आहे. धारावीत एकूण रुग्णांची संख्या १६२१ वर पोहोचली आहे. तर दादरमध्ये  ६ रूग्ण वाढले असून येथे  रूग्णसंख्या २४५ वर पोहोचली आहे.माहिममध्ये २४ रूग्ण वाढले असून एकूण कोरोना रूग्णसंख्या ३७५ वर पोहोचली आहे.

रुग्णसंख्या अधिक असलेले भाग

1. जी उत्तर– 2598 रुग्ण – धारावी, दादर, माहिमचा भाग. इथे 17 दिवसात रुग्णसंख्या दुप्पट

2. ई– 2331 रुग्ण – भायखळा, मुंबई सेंट्रल.  17 दिवसात रुग्णसंख्या दुप्पट

3. एफ उत्तर– 2292 रुग्ण – वडाळा, सायन, माटुंगा.  17 दिवसात रुग्णसंख्या दुप्पट

4. एल – 2197 रुग्ण – कुर्ला. 11 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट

5. एच पूर्व- 2006 रुग्ण – वांद्रे पूर्व, सांताक्रूझ. 12 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट

6. के पश्चिम – 1968 रुग्ण – अंधेरी पश्चिम. 14 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट

7. जी दक्षिण- 1811 रुग्ण – वरळी, प्रभादेवीचा. 20 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट

8. के पूर्व – 1741 रुग्ण – अंधेरी पूर्व, जोगेश्वरी. 10 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट

9. एम पूर्व – 1620 रुग्ण – गोवंडी, मानखुर्द. 14 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट

10. एफ दक्षिण – 1530 रुग्ण – परळ. 9 दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट



हेही वाचा -

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोरोना रुग्णालयाची मागणी

राज्यात १ व २ जूनला राज्यात सर्वत्र मोसमीपूर्व पाऊस




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा