Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोरोना रुग्णालयाची मागणी


बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोरोना रुग्णालयाची मागणी
SHARES

मुंबईत लॉकडाऊन लागू झाल्यापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट बस वाहतूक सेवा पुरवत आहे. परंतु ही वाहतूक सेवा देत असताना अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळं बेस्ट कामगारांमध्ये संसर्ग वाढत आहे. सध्यस्थितीत कोरोनाची लागण झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळं उपक्रमानं चाचणी सुविधा, रुग्णालय, विलगीकरण कक्ष, रुग्णवाहिका पुरवाव्यात, अशी आग्रही मागणी बेस्ट वर्कर्स युनियनने बेस्ट महाव्यवस्थापकांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

बेस्ट कामगार दररोज कार्यरत असल्यानं त्यांना कोरोना संसर्गाची सर्वाधिक भीती आहे. अनेक बेस्टच्या आतापर्यंत ८ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. या परिस्थितीत कामगारांच्या वैद्यकीय चाचणी, उपचारांचाही प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे, बेस्ट उपक्रमाने वडाळा आगारातील तांत्रिक प्रशिक्षण केंद्रासह दिंडोशी आगारातही तात्पुरते कोरोना रुग्णालय आणि विलगीकरण कक्ष उभारण्याची मागणी या संघटनेनं केली आहे.

बेस्टकडून काही बसगाड्यांचे रूपांतर रुग्णवाहिकांमध्ये केले जाणार आहे. तेव्हा त्यातील चार रुग्णवाहिका बेस्ट कामगारांसाठी राखीव ठेवण्याचीही मागणी संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी केली आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांना पाठविलेल्या पत्रात या गोष्टी नमूद केल्या आहेत.



हेही वाचा -

घरपोच दारु हवी असल्यास परवाना आवश्यक, दिवसभरात 3691 जणांनी केले अर्ज

लॉकडाउनच्या काळात अवैध मद्यविक्री प्रकरणी 'इतके' गुन्हे दाखल



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा