Advertisement

पालिकेची नवी रणनिती, एका रुग्णाच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा घेणार शोध

मुंबईमधील रुग्णांची संख्या ३० हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे करोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत.

पालिकेची नवी रणनिती, एका रुग्णाच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा घेणार शोध
SHARES

 मुंबईख दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पालिकेने आता रुग्ण शोधण्यासाठी नवीन रणनिती आखली आहे. यानुसार एका कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे. तसे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी  पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबईमधील रुग्णांची संख्या ३० हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे करोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून एका करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ व्यक्तींचा शोध घ्यावा आणि त्यांची तपासणी करावी, असे आदेश चहल यांनी दिले.

चहल यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच एका रुग्णाच्या संपर्कातील १० व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सध्या काम सुरू होते. मात्र मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एका रुग्णाच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. यामुळे वेळीच संशयित रुग्ण सापडतील आणि त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल. 



हेही वाचा -

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोरोना रुग्णालयाची मागणी

राज्यात १ व २ जूनला राज्यात सर्वत्र मोसमीपूर्व पाऊस




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा