नवी मुंबईत रविवारी कोरोनाचे नवीन १८१ रुग्ण

नवी मुंबईत रविवारी (२५ ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन १८१ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४३,६२६ झाली आहे.

रविवारी बेलापूर ३५, नेरुळ ४१, वाशी ३८, तुर्भे १५, कोपरखैरणे १६, घणसोली १५, ऐरोली १६, दिघामध्ये ५ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ४०, नेरुळ ४७, वाशी २७, तुर्भे २३, कोपरखैरणे ३८,  घणसोली २४, ऐरोली ३८, दिघामधील २ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४०,४०० झाली आहे. तर मृतांचा आकडा ८७८ झाला आहे. नवी मुंबईत सध्या २३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९२ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा- 

मुंबईत वाहतूक पोलिसाला महिलेकडून मारहाण, संजय राऊतांची कारवाई करण्याची मागणी

भाजपला मोठा झटका! खडसेनंतर या 'बंडखोर' आमदाराने ठोकला रामराम


पुढील बातमी
इतर बातम्या