नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन १८८ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (१३ ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन १८८ रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४०,८२७ झाली आहे.

मंगळवारी बेलापूर ३१, नेरुळ २२, वाशी २२, तुर्भे २७, कोपरखैरणे २६, घणसोली २१, ऐरोली ३५, दिघामध्ये ४ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ५६, नेरुळ ६६, वाशी ५४, तुर्भे ३४, कोपरखैरणे ७५,  घणसोली २२, ऐरोली ७०, दिघामधील १ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६,७८४ झाली आहे. तर मृतांचा आकडा ८२८ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ३२१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९० टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा -

केम्स कॉर्नर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

One Nation One Card: बेस्टमध्ये 'वन नेशन, वन कार्ड'च्या उपक्रमाला सुरुवात


पुढील बातमी
इतर बातम्या