पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी १९९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ( ७ सप्टेंबर) १९९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कळंबोली आणि कामोठे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. १०७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ३९,  नवीन पनवेलमधील २०, खांदा कॉलनीतील १०, कळंबोली-रोडपाली येथील ३८, कामोठ्यातील ३२, खारघरमधील ३२,  तळोजा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील १७,  नवीन पनवेलमधील १२ कळंबोली-रोडपाली येथील २०, कामोठ्यातील २२, खारघरमधील ३४,  तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १३४१९ कोरोना रूग्णांपैकी ११३५१ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३१६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १७५२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा -

मुंबईत अतिदक्षता खाटांची कमतरता

लोकल ट्रेन सुरू झालीच पाहिजे! विरार स्थानकात प्रवाशांचा उद्रेक


पुढील बातमी
इतर बातम्या