ब्रिटनहून भारतात आलेले २१ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

ब्रिटनमधून भारतात आलेले २१ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे प्रवासी दिल्ली, चेन्नई, अमृतसर, कोलकाता, अहमदाबाद अशा वेगवेगळ्या विमानतळांवर दाखल झालेले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांमध्ये सोमवारी रात्री दिल्लीत लँड करणारे ६, रविवारी रात्री कोलकाता येथे येणारे २, मंगळवारी अहमदाबाद येथे येणारे ४ आणि अमृतसरला आलेल्या एका क्रू मेंबरचा समावेश आहे. हे सर्वजण एअर इंडियाच्या विमानाने लंडनहून भारतात आले होते. संक्रमित व्यक्तीचे नमुने चाचणीसाठी पुण्याच्या 'नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ वायरोलॉजी'कडे पाठवण्यात आले आहेत.  

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू हा आधीच्या कोरोनापेक्षा झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये  लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतानं २३ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत ब्रिटनला येणाऱ्या - जाणाऱ्या सगळ्या विमानांवर बंदी घालती आहे.

कोरोनाचा नवा प्रकार रोखण्यासाठी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये करोना संक्रमित आढळलेल्या रुग्णांना एका वेगळ्या आयसोलेशन युनिटमध्ये इन्स्टिट्युशन क्वारंटीनमध्ये ठेवण्यात येईल.


हेही वाचा-

महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 'स्मार्ट सहेली' योजना

मुंबई-ठाण्यात पोलिसांची संचारबंदी


पुढील बातमी
इतर बातम्या