मुंबई-ठाण्यात पोलिसांची संचारबंदी


मुंबई-ठाण्यात पोलिसांची संचारबंदी
SHARES

कोरोनाचे वाढते संकट (Corona crisis) पाहता मुंबईत (Mumbai) पुन्हा सरकारने नाईट कर्फ्यू (night curfew) लागू केला आहे. काल रात्रीपासून त्याची कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. ५ जानेवारीपर्यंत हा कर्फ्यू लागू असेल. रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत कडकडीत कर्फ्यू असणार आहे. या कर्फ्यूच्या पार्श्वभूमिवर मुंबईत आता पोलिस रात्री ठिक ठिकाणी नाकांबदी लावून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहेत.

हेही वाचा:- रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ लांबणीवर

देशात एकीकडे कोरोनाचे ( Coronavirus) संकट वाढत आहे. दुसरीकडे युरोपात पसरत असलेल्या कोरोनाच्या ( Coronavirus) नव्या स्ट्रेनची भीती आहे. त्यातच नाताळ आणि न्यू इयर सेलिब्रेशनच्या मूडमध्ये नागरिक कोरोना कहर संपला असल्याचे समजून बिनदिक्कत फिरत आहेत. परिस्थिती जरी नियंत्रणात असली. तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे कोणत्याही स्थितीत कोरोनाचा फैलाव पुन्हा होऊ नये म्हणून उत्साहाला आळा घालण्यासाठीच नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. पोलिसांनी काल रात्रीपासून मुंबईत अनेक भागात नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करत कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली. मुंबईसह ठाण्यातही त्याची अंमलबजावणी केली जात आहे. पोलिसांकडून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात येतेय. यात दोषी आढळणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात येतेय. ख्रिसमस आणि न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीय. अत्यावश्यक सेवा, दूध-भाजीपाला वगळता इतर आस्थापने ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे ६पर्यंत बंद असणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा