पनवेल महापालिका हद्दीत रविवारी २१२ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत रविवारी (२० सप्टेंबर) २१२ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर १९२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसंच कामोठ्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ४५, नवीन पनवेलमधील १४, खांदा कॉलनीतील ७, कळंबोली-रोडपाली येथील ३७,  कामोठ्यातील ५०, खारघरमधील ५४, तळोजा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील ३३,  नवीन पनवेलमधील ५१, कळंबोली-रोडपाली येथील २०, कामोठ्यातील ३८, खारघरमधील ३९,  तळोजा येथील ११ रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १६४६३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १३९७८ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३७० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे २११५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा -

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस 

ठाकरे सरकार क्वीन्स नेकलेसचं सौंदर्य का बिघडवतंय ? भाजपचा प्रश्न


पुढील बातमी
इतर बातम्या