Advertisement

ठाकरे सरकार क्वीन्स नेकलेसचं सौंदर्य का बिघडवतंय ? भाजपचा प्रश्न

शिवसेनेची मंडळी जेव्हा सरकारमध्ये आली, त्यावेळी चक्क त्यांनी क्वीन्स नेकलेसचा १ किमीचा भाग तुटून जाणार अशी परिस्थिती निर्माण केली आहे.

ठाकरे सरकार क्वीन्स नेकलेसचं सौंदर्य का बिघडवतंय ? भाजपचा प्रश्न
SHARES

केंद्र सरकारच्या पुढाकाराने जेव्हा मुंबईत पर्यावरणपूरक एलईडी दिवे लावण्यात आले, तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्वीन्स नेकलेसची शोभा जाईल म्हणून थयथयाट केला होता. परंतु आता तेच क्वीन्स नेकलेसची माळ तोडून टाकत आहेत. हा दुटप्पीपणा, ढोंगीपणा असल्याचा आरोप भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेतील आणि राज्यातील सत्ताधारी शिवसेनेवर केला आहे. (bjp mla ashish shelar questioned shiv sena over coastal road project on queens necklace on marine drive)

मुंबईचं सौंदर्य मरिन ड्राईव्हच्या क्वीन्स नेकलेसमध्ये सामावलेलं आहे. देशातून, परदेशातून लोकं मरिन ड्राईव्हवर क्वीन्स नेकलेस बघण्यासाठी येतात. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या योजनेमधून क्वीन्स नेकलेसवर एलईडी बल्ब लावण्याचा कार्यक्रम ज्यावेळी झाला, त्यावेळी रंग बदलतोय, बल्ब पर्यावरणपूरक असले, तरी ते आम्हाला मान्य नाहीत, सौंदर्यात खंड पडतोय, अशा पद्धतीने ओरडणारी शिवसेनेची मंडळी जेव्हा सरकारमध्ये आली, त्यावेळी चक्क त्यांनी क्वीन्स नेकलेसचा १ किमीचा भाग तुटून जाणार अशी परिस्थिती निर्माण केली आहे.

हेही वाचा - एका ‘बबड्याच्या’ हट्टापायी विद्यार्थ्यांना मानसिक त्रास- आशिष शेलार

समुद्रातसुद्धा कोस्टल रोडच्या निमित्ताने जो भराव केला, त्यात अधिकचा भराव कुणासाठी केला, त्या जागा कुणाला देणार आहेत. त्यामुळे सौंदर्यात वाढ होणार आहे की सौंदय कमी होणार आहे, याचं उत्तरही देत नाहीत. म्हणून आपण केलेलं पुण्य, दुसऱ्याने केलेलं पाप अशा अहंकारी पद्धतीने काम करणारं ठाकरे सरकार मुंबईच्या सौंदर्यावर घाला का घालतंय? क्वीन्स नेकलेसमधील १ किमीचा भाग खंडीत का करतंय? अधिकच्या जागेवर भराव का करतेय, याचं आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

आता पारसी गेट तोडलाच...समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार...परिसराची शोभा घालवणार. आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप? झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचं बेगडी प्रेम उघड?

मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या "ढोंगीपणाचा गाळ" दिसला ना! अशा शब्दांत शिवसेनेला टोला देखील आशिष शेलार यांनी हाणला आहे.

 हेही वाचा - कोस्टल रोडसाठी १५ हेक्टरचा भराव

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा