पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी २१५ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (१८ सप्टेंबर) २१५ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २ मृत्यूंची नोंद झाली असून खांदा कॉलनी आणि कळंबोली येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. २५४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ५०, नवीन पनवेलमधील १६, खांदा कॉलनीतील १०, कळंबोली-रोडपाली येथील २०,  कामोठ्यातील ६४, खारघरमधील ५३, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील ५५,  नवीन पनवेलमधील ४३, कळंबोली-रोडपाली येथील ३०, कामोठ्यातील ५३, खारघरमधील ६६,  तळोजा येथील ७ रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १६०५६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १३५५२ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३६७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे २१३७ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा -

कोरोनाने १० दिवसांत 'इतक्या' ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू

जम्बो कोरोना केंद्रांत 'या' मोठ्या हॉस्पिटलमधील डॉक्टर देणार सेवा


पुढील बातमी
इतर बातम्या