Advertisement

जम्बो कोरोना केंद्रांत 'या' मोठ्या हॉस्पिटलमधील डॉक्टर देणार सेवा


जम्बो कोरोना केंद्रांत 'या' मोठ्या हॉस्पिटलमधील डॉक्टर देणार सेवा
SHARES

कोरोनाबाधित रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी पालिकेने भायखळा, एनएससीआय-वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल, नेस्को-गोरेगाव, मुलुंड आणि दहिसर इथं जम्बो करोना केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये ७ हजार ६५० रुग्णशय्या असून तिथे सुमारे एक हजार ४६६ कर्मचारी कार्यरत आहेत. शिवाय केंद्रांमधील रुग्णांवर उत्तम प्रकारे उपचार व्हावेत यासाठी ११ खासगी रुग्णालयांमधील ३५ तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्यात येणार असून हे डॉक्टर दूरध्वनीवरून सल्लागार स्वरूपात जम्बो करोना केंद्रांना सेवा देणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार या केंद्रांना भेट देऊन तेथील डॉक्टरांशी सल्लामसलत करणार आहेत.

केईएम, नायर, शीव आदी प्रमुख रुग्णालयांमधील तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कक्ष परिचर (वॉर्डबॉय) आदींचा समावेश आहे. या केंद्रांमध्ये दाखल रुग्णांना उत्तम उपचार मिळावेत यासाठी पालिका प्रयत्नशील होती. त्यासाठी मोठ्या रुग्णालयांमधील डॉक्टरांची संपर्क साधण्यात येत होता. मुंबईतील ११ मोठ्या रुग्णालयांतील ३५ तज्ज्ञ डॉक्टरांकडून पालिकेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या डॉक्टरांनी दूरध्वनीवरून जम्बो कोरोना केंद्रात सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे.

भायखळा येथील रिचर्डसन अ‍ॅण्ड क्रुडास कंपनीच्या आवारातील जम्बो कोरोना केंद्रात दाखल रुग्णांसाठी जसलोक रुग्णालयातील २, तर भाटिया रुग्णालयातील ३ तज्ज्ञ डॉक्टरांनी सल्लागार स्वरूपात सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. एनएससीआयमधील जम्बो कोरोना केंद्रात बॉम्बे रुग्णालय आणि ब्रिच कॅण्डी रुग्णालयातील अनुक्रमे पाच व तीन तज्ज्ञ डॉक्टर, वांद्रे – कुर्ला संकुलातील जम्बो करोना केंद्रात लीलावती आणि हिंदुजा रुग्णालयातील अनुक्रमे तीन व चार तज्ज्ञ डॉक्टर सल्लागार स्वरूपात सेवा देणार आहेत.

संबंधित विषय