कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे २४४ नवे रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी कोरोनाचे नवीन २४४ रुग्ण आढळले. तर ९ जणांचा मृत्यू झाला. येथील मृतांची संख्या आता ६०० च्या वर गेली आहे.

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २७,९२८ झाली आहे. यामध्ये ३१८७ रुग्ण उपचार घेत आहेत.  गेल्या २४ तासांत ३९१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत २४,१४० रूग्ण बरे झाले आहेत.  तर आतापर्यंत ६०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ४५, कल्याण पश्चिम ७४, डोंबिवली पूर्व ७७, डोंबिवली पश्चिम २४, मांडा टिटवाळा २०, मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८७ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ७ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, १ रुग्ण हॉलीक्रॉस रुग्णालयातून, ७ रुग्ण पाटीदार कोव्हिड केअर सेंटरमधून, १ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ४ रुग्ण आसरा फाऊंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा -

दादर, माहीम, धारावीत मलेरियाविरोधात महापालिकेची विशेष मोहीम

मुंबईत पावसाला सुरुवात, पुढच्या २४ तासासाठी हवामान खात्याचा इशारा


पुढील बातमी
इतर बातम्या