Advertisement

मुंबईत पावसाला सुरुवात, पुढच्या २४ तासासाठी हवामान खात्याचा इशारा

मुंबईत मध्यम ते हलका स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाणे, रायगड जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

मुंबईत पावसाला सुरुवात, पुढच्या २४ तासासाठी हवामान खात्याचा इशारा
SHARES

गेले काही दिवस महाराष्ट्रात पावसानं विश्रांती घेतली होती. पण मुंबईतल्या काही भागात शुक्रवारी सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शिवाय पुढील २४ तासांत महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.

मुंबईत मध्यम ते हलका स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाणे, रायगड जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. गेले काही दिवस राज्यात पावसानं विश्रांती घेतली होती.

हेही वाचा : माहुल गावात प्रदूषण करणाऱ्या ४ कंपन्यांना २८६ कोटींचा दंड

आता पुढील 24 तासांत विदर्भ, मराठवाडा तसंच उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असल्यानं नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, यंदा जुलै महिन्यात वरूणराजानं मोठा ब्रेक घेतल्यानं पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूननं सर्वदूर बँटिग सुरू केली. काही आठवड्यांआधी झालेल्या पावसाची सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील बहुतांश धरणं भरुन गेली आहेत.हेही वाचा

'या' कारणास्तव पालिकेची पश्चिम रेल्वेला नोटीस

स्थगितीनंतरही आरेत काम सुरू, प्रजापूर पाड्यातील रहिवाशांचा दावा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा