Advertisement

'या' कारणास्तव पालिकेची पश्चिम रेल्वेला नोटीस

कार्यकर्ता आणि वकील दीपक चट्टोपाध्याय यांनी यासंदर्भात पालिकेकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर नोटीस बजावण्यात आली आहे.

'या' कारणास्तव पालिकेची पश्चिम रेल्वेला नोटीस
SHARES

रेल्वे कॉलनींमध्ये होणाऱ्या वृक्षतोडी संदर्भात पालिकेनं पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. कार्यकर्ता आणि वकील दीपक चट्टोपाध्याय यांनी यासंदर्भात पालिकेकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीत म्हटलं आहे की, रेल्वेच्या निवासी वसाहतीत सुमारे १० झाडे तोडण्यात आली. पण रेल्वे अधिकारी कारवाई करण्यात अपयशी ठरले. अधिकाऱ्यांना अनेकदा यासंदर्भात पत्र लिहली गेली. पण त्याची दखल घेतली गेली नाही. तुळशी पाईप रोडवरील माटुंगा रेल्वे कॉलनीतील हा प्रश्न आहे.

“पालिका किंवा रेल्वेकडून कोणतीही परवानगी घेतल्याशिवाय काही रहिवाशांनी एका खासगी कंत्राटदाराकडून झाडे तोडून घेतली. झाडे तोडल्यानंतर रिकाम्या जागेचा उपयोग वाहनं उभी करण्यासाठी करण्यात आला,”असं चट्टोपाध्याय म्हणाले.

हेही वाचा :  मुंबईतल्या सातही धरणांमध्ये ६० टक्के पाणीसाठा

महाराष्ट्र शासनानं (शहरी क्षेत्र) संरक्षण आणि वृक्ष संरक्षण कायदा १९७५ चं उल्लंघन केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे. ते म्हणाले, “एक झाड पाडण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाला प्रस्ताव सादर करावा असा कायद्यात आदेश आहे. मात्र, असा कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. अशा घटनांमुळे मुंबईतील हिरवळ नष्ट होत आहे.”

जी उत्तर विभागातील पालिकेच्या वृक्ष विभागानं असं म्हटलं आहे की, त्यांनी झाडे तोडण्यास कोणतीही परवानगी दिली नाही. पालिकेचे वृक्ष अधिकारी रूपेश पूजारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांना आढळलं की, सुमारे सहा ते सात झाडे पडलेली आहेत. शिवाय झाडांच्या फांद्या तिकडेच पडलेल्या होत्या.

महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे सहाय्यक अधीक्षक दयानंद मुंढे म्हणाले की, “आम्ही पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून या संदर्भात स्पष्टीकरण मागितलं आहे. झाडे तोडण्याची परवानगी त्यांना देण्यात आल्याचं परवानगी पत्र त्यांनीसादर केलं नाही तर १९७५ च्या कायद्याच्या उल्लंघनासाठी कारवाई केली जाईल.”

पश्चिम रेल्वेनं त्या जागेवर झाडे तोडल्याच्या सर्व आरोपांना नकार दिला आहे. “आम्हाला पालिकेची कोणतीही सूचना मिळालेली नाही. पालिकेच्या परवानगीशिवाय कोणत्याही झाडाची तोडणी केली गेली नाही. डब्ल्यूआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले की, एखादी खासगी पार्टी सामील झाली असेल तर त्यावर कारवाई करणं हे पालिकेच्या अखत्यारीत आहे.



हेही वाचा

स्थगितीनंतरही आरेत काम सुरू, प्रजापूर पाड्यातील रहिवाशांचा दावा

माहुल गावात प्रदूषण करणाऱ्या ४ कंपन्यांना २८६ कोटींचा दंड

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा