Advertisement

मुंबईतल्या सातही धरणांमध्ये ६० टक्के पाणीसाठा

गुरुवापर्यंत धरणात ८ लाख ७० हजार दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला होता.

मुंबईतल्या सातही धरणांमध्ये ६० टक्के पाणीसाठा
SHARES

ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावली. जुलै महिन्यात पाऊस दडी मारून बसला होता. याचाच परिणाम मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात कमी प्रमाणात पाण्याचासाठा शिल्लक होता. याच कारणास्तव मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना देखील करावा लागला होता. पण आता एकाच दिवशी म्हणजे बुधवारी झालेल्या पावसानं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत मिळून ६० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या दहा बारा दिवसांत साधारण तीन महिन्याचा पाणीसाठा जमा झाला आहे. गुरुवापर्यंत धरणात ८ लाख ७० हजार दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला होता.

वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी सर्व तलाव पूर्ण क्षमतेनं भरलेलं असावं लागतं. १ ऑगस्ट रोजी तलावात अवघा ५ लाख १ हजार १६० दशलक्ष लिटर म्हणजे ३४.६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. गेल्या दहा बारा दिवसात तलावात तीन लाख ६९ हजार ६९७ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा खूप कमी आहे.

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर )

अप्पर वैतरणा २,२७,०४७ ९७,१४१ ४२.७८

मोडकसागर १,२८,९२५ ९०,६४२ ७०.३१

तानसा १,४५,०८० ८८,६७४ ६१.१२

मध्य वैतरणा १,९३,५३० १,२३,०५८ ६३.५९

भातसा ७,१७,०३७ ४,३५,५८३ ६०.७५

विहार २७,६९८ २७,६९८ १००

तुलसी ८,०४६ ८,०४६ १००

एकूण ८,७०,८४२ १४,४७,००० ६०.१७

दरम्यान, १५ ऑगस्टपासून पुढचे ५ दिवस मुंबई हायअलर्टवर आहे. कारण पुढचे ५ दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. येत्या पाच दिवसात कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्यानं जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.



हेही वाचा

Mumbai Rains : शुक्रवारी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता">Mumbai Rains : शुक्रवारी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

१५ ऑगस्टपासून पुढचे ५ दिवस पावसाचे, हवामान खात्याचा अलर्ट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा