पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी २४४ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (१० सप्टेंबर) २४४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ११० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ७ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खारघरमधील २, कामोठ्यातील २ तसेच खांदा कॉलनी आणि नवीन पनवेल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ४७,  नवीन पनवेलमधील २९, खांदा कॉलनीतील १८, कळंबोली-रोडपाली येथील ४०, कामोठ्यातील ६४, खारघरमधील ३८,  तळोजा येथील ७ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील १८,  नवीन पनवेलमधील ११, कळंबोली-रोडपाली येथील १४, कामोठ्यातील ३३, खारघरमधील ३०,  तळोजा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. 

 दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १४१११ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ११८२७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३२८ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १९५६ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा

मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी दोन महिन्यांवर

लढाई कोरोनाशी: घर ते शास्त्रीनगर रुग्णालय


पुढील बातमी
इतर बातम्या