Advertisement

मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी दोन महिन्यांवर

काही दिवसांपूर्वी मुंबईतील कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.

मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी दोन महिन्यांवर
SHARES

काही दिवसांपूर्वी मुंबईतील कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालवधी आता तीन महिन्यांवरून दोन महिन्यांवर आला आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर पुन्हा एकदा एक टक्कय़ापेक्षा पुढे गेला आहे.

 बोरिवली, कांदिवली, वांद्रे पश्चिम, दहिसर, मुलुंड, गोरेगाव या भागात रुग्णांची संख्या वाढतच आहे. येथील रुग्णवाढीचा दर १.३ टक्क्यांच्या वर गेला आहे. मंगळवारी १३४६ नवीन रुग्ण आढळले. ८८७ रुग्ण बरे झाले. मुंबईतील मृतांची एकूण संख्या ७९३९ वर गेली आहे. मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा १ लाख ५८ हजार ७५६ वर गेला आहे.   आतापर्यंत १ लाख २५ हजार ९०६  म्हणजेच ७९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईत २४,५५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

 काही दिवसांपासून मुंबईतील मृतांची संख्या ३० ते ३५ च्या आतच होती. मृतांची संख्या पुन्हा एकदा ४० च्या पुढे गेली आहे. मुंबईत ८ लाख ४३ हजार ६९१ चाचण्या करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा -

कोरोनाच्या काळात मुंबईतल्या मेट्रोचे काम वेगानं सुरू

रिया चक्रवर्तीला भायखळा कारागृहात हलवले



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा