Advertisement

कोरोनाच्या काळात मुंबईतल्या मेट्रोचे काम वेगानं सुरू

मुंबईत साध्यस्थीतीत कोरोनाचा प्रादुर्भाव असून, या कोरोनाच्या काळात मुंबईतल्या मेट्रोचे काम वेगानं सुरू आहे.

कोरोनाच्या काळात मुंबईतल्या मेट्रोचे काम वेगानं सुरू
SHARES

भविष्यात मुंबईत धावणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या बांधकामांना गती मिळाली आहे. त्याशिवाय, या मेट्रोसाठीचे ३७८ कोच एप्रिल २०२१पर्यंत दाखल होतील, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. मुंबईत साध्यस्थीतीत कोरोनाचा प्रादुर्भाव असून, या कोरोनाच्या काळात मुंबईतल्या मेट्रोचे काम वेगानं सुरू आहे. विशेषतः मेट्रो-२ व मेट्रो-७चे काम वेगाने सुरू असून, मिळालेल्या माहितीनुसार, ६ मेट्रो कोच हे ११ डिसेंबरच्या आसपास दाखल होतील, असंही प्राधिकरणाचे म्हणणं आहे. 

मेट्रो लाइन २ अ, २ ब आणि ७ या मार्गावरील मेट्रोची निर्मिती करण्यासाठी बीईएमएलची निवड करण्यात आली असतानाच डिसेंबर २०२०पासून मेट्रो कोच मुंबईमध्ये दाखल होऊ लागतील. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रोलिंग स्टोकचे कंत्राट बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स याना दिले आहे. मुंबई मेट्रोचे कोच हे पर्यावरणपूरक असल्याची माहिती मिळते.

मेट्रोचे कोच बंगळुरूहुन मुंबईत आणण्याबाबत मागच्या आठवड्यात निविदा काढण्यात आल्या होत्या. दरम्यान एकूण ३७८ कोच वेगवेगळ्या टप्प्यात दाखल होतील. ६ कोचची पहिली मेट्रो ११ डिसेंबरपर्यंत दाखल होईल. मेट्रो-२ दहिसर डी.एन. नगर आणि मेट्रो-७ दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व हे दोन्ही मार्ग येत्या काही महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा