रिया चक्रवर्तीला भायखळा कारागृहात हलवले

'एका व्यसनाधीन आणि मानसिक आजाराशी झुंजणार्‍या माणासाने आतमहत्या केली आणि त्याच्या प्रेमात रिया होती ही, तिची चूक'

रिया चक्रवर्तीला  भायखळा कारागृहात हलवले
SHARES

सुशांतला ड्रग्ज दिल्या प्रकरणी रिया चक्रवर्तीला मंगळवारी एनसीबीने अटक केल्यानंतर न्यायालयाने तिला १४ दिवसांची म्हणूजेच २२ सप्टेंबरपर्यंतची कस्टडी सुनावली. त्यामुळेच कालची रात्र एनसीबीच्या जेलमध्ये काढल्यानंतर बुधवारी सकाळी रिया चक्रवर्तीची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणी रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी काल तिच्या अटकेनंतर प्रतिक्रिया देताना, ' एका व्यसनाधीन आणि मानसिक आजाराशी झुंजणार्‍या माणासाने आतमहत्या केली आणि त्याच्या प्रेमात रिया होती ही, तिची चूक' असं म्हटलं आहे. सोबतच तिच्या मागे ३ केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला आहे. मात्र लवकरच रिया यामधून बाहेर येईल असं म्हटलं आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अखेर तीन दिवसांच्या चौकशीनंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. सुशांतला ड्रग्ज दिल्याच्या आरोपाखाली एनसीबीने रिया आणि शौविक चक्रवर्तीला अटक केली. दोन्ही मुले तुरुंगात गेल्याने रियाचे वडिल इंद्रजीत चक्रवर्ती हे भाऊक झाले असून त्यांनी ‘मी या जगातला वाईट बाप आहे’ अशा आशयाचे ट्विट केले आहे. तर मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी इंद्रजीत चक्रवर्ती उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती इंद्रजीत चक्रवर्ती यांनी ट्विटद्वारे सांगितली. 

सुशांतच्या आत्महत्येला आता तीन महिने उलटत आले. मात्र तरीही सुशांतच्या आत्महत्ये मागील कारण आजही गुलदस्त्यात आहे. या  आत्महत्या प्रकरणात मात्र पहिल्या दिवसांपासून रिया चक्रवर्तीकडे संशयित आरोपी म्हणून पाहिले जात आहे. कधी ईडी,तर कधी सीबीआय, तर कधी एनसीबी या तिनही तपास यंत्रणाकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. अखेर तीन दिवसांच्या चौकशीनंतर रियाला सुशांतला ड्रग्ज दिल्याच्या आरोपाखाली एनसीबीने मंगळवारी अटक केली. या अटकेपूर्वी ज्या ज्या वेळी रिया ईडी, सीबीआय किंवा एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिली. त्या त्या वेळी पत्रकारांचे कॅमेरे तिच्या अवती भवतीच होते. यावरून इंद्रजित पांडे यांनी एक बाप हे चित्र कधीच पाहू शकत नाही असे त्यांनी ट्विट केले.

रियाचे वडिल इंद्रजीत चक्रवर्ती घेणार राज ठाकरेंची भेट

एनसीबीने सुशांतला ड्रग्ज दिल्या प्रकरणी रियाला अटक केल्यानंतर रियाचे वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांना त्यांच्या भावना अनावर झाल्या, त्यांनी ट्विटरवर नागरिकांना मदतीसाठी आणि सहकार्य करण्यासाठी आवाहन केले आहे. हे करत असतानाच इंद्रजीत यांनी आपण रियाला न्याय मिळवून देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती ट्विटरवर शेअर केली आहे. बाॅलीवूडमध्ये संकटात असलेल्या अनेक कलाकारांनी यापूर्वी कृष्णकुंजची पायरी चढत राज यांच्याकडे मदत मागितल्याची अनेक उदाहरण आहेत. त्यामुळेच इंद्रजीत हे राज ठाकरे यांच्याकडे मदत मागण्यासाठी जात असल्याचे सांगितले जाते. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा