Exclusive : राज ठाकरेंचं 'म्हणणं खरं ठरलं, महाराष्ट्राच्या कारागृहातही परप्रांतीय कैद्यांची गर्दी

परप्रांतियच नाही तर परदेशी अंडरट्रायल कैद्यांबाबतही महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे.

Exclusive : राज ठाकरेंचं 'म्हणणं खरं ठरलं, महाराष्ट्राच्या कारागृहातही परप्रांतीय कैद्यांची गर्दी
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून अनेकदा महाराष्ट्रात कायदा हातात घेणाऱ्यांमध्ये परप्रांतियांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचे बोलून दाखवले होते. राज यांचं हे म्हणणं आता खरं ठरलं आहे.  महाराष्ट्राच्या कारागृहात सर्वाधिक परप्रांतीय आरोपी असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या २०१९ च्या राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. परप्रांतियच नाही तर परदेशी अंडरट्रायल कैद्यांबाबतही महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- पत्रकार महिलेला अश्लील मेसेज, आरोपी गजाआड

देशातील राज्यांमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांचा लेखा-जोखा मांडणारा ' राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी)' हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात राज्यातील कारागृहांमध्ये परराज्यातील ४ हजार ६७५ कैदी अंडरट्रायल असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत देशात हा आकडा सर्वाधिक आहे.

राज्यातील एकूण अंडरट्रायल कैद्यांमध्ये १६ टक्के परप्रांतीय अंडरट्रायल कैदी आहेत. कोणत्याही राज्याच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशातील कारागृहांमध्ये ३ हजार ४७० परराज्यातील अंडरट्रायल कैदी आहेत.

उत्तर प्रदेशात परप्रांतीय अंडर ट्रायल कैद्यांचे प्रमाण ११.८ टक्के आहे. याबाबत तिस-या क्रमांकावर दिल्ली आहे. दिल्लीत ३ हजार ४५३ परप्रांतीय अंडरट्रायल कैदी आहेत. दिल्लीत परप्रांतीय अंडरट्रायल कैद्यांचे प्रमाण ११.८ टक्के आहे. तर परदेशी कैदीच्या प्रमाणात ही महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये ४६६ परदेशी अंडर ट्रायल कैदी आहेत. त्याबाबत राज्य देशात दुस-या क्रमांकावर आहे. सर्वाधीक म्हणजे ५७६ परदेशी अंडर ट्रायल कैदी पश्चिम बंगालमध्ये आहेत.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे ११७९ नवे रुग्ण, ३२ जणांचा दिवसभरात मृत्यू

देशात २०१९ मध्ये अंडरट्रायल कैद्यांचे प्रमाण अचानक वाढले. २०१८ मध्ये देशात ३ लाख २३ हजार ५३७ कैदी होते. २०१९ मध्ये त्यांचे प्रमाण ३ लाख ३० हजार ४८७ वर पोहोचले आहे. अंडर ट्रायल कैद्यांची संख्या पाहिली तर महाराष्ट्र त्याबाबत देशात तिस-या क्रमांकावर आहे. २०१९ मध्ये राज्याच्या कारागृहांमध्ये २७ हजार ५५७ अंडरट्रायल कैदी होते. याबाबत उत्तर प्रदेश अव्वल आहे.

उत्तर प्रदेशात सर्वाधीक म्हणजेच ७३ हजार ४१८ अंडरट्रायल कैदी आहेत. राज्यातील
सर्वाधिक अंडरट्रायल असण्यामागे दोन कारणे असल्याचे जाणकारांचे मत आहे. पहिले म्हणजे येथे परराज्यातून येणा-या व्यक्तींकडून गुन्हे करण्याचे प्रमाण अधिक आहे. दुसरे कारण म्हणजे राज्यातील पोलिस सक्षम असून परराज्यातूनही आरोपींना पकडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने म्हटले.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा