Advertisement

मुंबईत कोरोनाचे ११७९ नवे रुग्ण, ३२ जणांचा दिवसभरात मृत्यू

सोमवारी दिवसभरात ९१७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख १७ हजार २६८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त

मुंबईत कोरोनाचे ११७९ नवे रुग्ण, ३२ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात सोमवारी कोरोने १८४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत सोमवारी दिवसभरात ११७९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सोमवारी दिवसभरात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-अरे बापरे ! राज्यात ४२२ जणांचा एका दिवसात कोरोनाने मृत्यू, ११ हजार ११९ नवे रुग्ण

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत सोमवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३२ रुग्ण दगावले आहेत. तर ३० आॅगस्ट रोजी ३० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २९ आॅगस्ट रोजी एकूण ३१ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे ११७९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ४५ हजार ८०५ इतकी झाली आहे. तर सोमवारी दिवसभरात ९१७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख १७ हजार २६८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-भरधाव कारने ४ जणांना चिरडले, क्रॉफर्ड मार्केट येथील घटना

राज्यात आज ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले तर ११ हजार ८५२ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९४  हजार ५६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ लाख ३८ हजार ९३९ नमुन्यांपैकी ७ लाख ९२ हजार ५४१ नमुने पॉझिटिव्ह (१९.१४ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ५५ हजार ३३० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ७२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१ टक्के एवढा आहे.

 

आज निदान झालेले ११,८५२ नविन रुग्ण आणि नोंद झालेले १८४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११७९ (३२), ठाणे- २२१ (१०), ठाणे मनपा-२०७ (९), नवी मुंबई मनपा-३०४ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३५९ (१), उल्हासनगर मनपा-५५ (३), भिवंडी निजामपूर मनपा-१०, मीरा भाईंदर मनपा-१३२, पालघर-८२ (२), वसई-विरार मनपा-१५९ (१), रायगड-२७२, पनवेल मनपा-१९१ (१), नाशिक-२०२ (१), नाशिक मनपा-६५१ (२), मालेगाव मनपा-४२, अहमदनगर-१८० (२),अहमदनगर मनपा-५७  (१), धुळे-११३ (२), धुळे मनपा-६८ (१), जळगाव- ४६२ (१०), जळगाव मनपा-१४४ (१), नंदूरबार-१०५, पुणे- ४६४ (२), पुणे मनपा-८७५ (७), पिंपरी चिंचवड मनपा-५९२, सोलापूर-२२२ (३), सोलापूर मनपा-४४ (१), सातारा-४२२(७), कोल्हापूर-३२० (१५), कोल्हापूर मनपा-१९६ (४), सांगली-४४६ (५), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३०१ (१), सिंधुदूर्ग-१३६, रत्नागिरी-८२ (१), औरंगाबाद-१९३ (२),औरंगाबाद मनपा-१८८ (२), जालना-९३ (२), हिंगोली-५९, परभणी-३९, परभणी मनपा-३९, लातूर-१२१ (३), लातूर मनपा-५३ (१), उस्मानाबाद-१३२ (६),बीड-९४ (३), नांदेड-१२५ (४), नांदेड मनपा-१४९ (४), अकोला-३, अकोला मनपा-७, अमरावती-३२, अमरावती मनपा-९२, यवतमाळ-३७ (३), बुलढाणा-६६ (१), वाशिम-४ (१) , नागपूर-१५६ (३), नागपूर मनपा-६४५ (१२), वर्धा-५, भंडारा-२३, गोंदिया-२९ (१), चंद्रपूर-४४ (१), चंद्रपूर मनपा-१११ (१), गडचिरोली-६, इतर राज्य १२.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा