मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट (Crawford Market) येथे होंडा सिटी कारने ४ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचाः- बाप्पाच्या विसर्जनासाठी यंदा ४४५ विसर्जनस्थळं सज्ज
दक्षिण मुंबईतच्या क्राॅफर्ड मार्केट परिसरात कायमच खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असतात. रात्री ९ च्या सुमारास या गर्दीच्या ठिकाणी एका कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, त्यावेळी त्याच्या भरधाव कारने चार जणांना चिरडले, नईम, सरोज, जुबेडा आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले असून मोहम्मद जुही, नदीन अन्सारी, कमलेश, मोहम्मद नदीम अशी या चौघांची नावे आहेत. या सर्वांना तातडीने जवळील जे.जे.रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
हेही वाचाः- वांद्रे-कुर्ला संकुलात युलु ई-बाईक सुविधा
या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी तातडीने मदत कार्यास सुरूवात केली. तसेच, तपासही सुरु केला आहे. दरम्यान, ही कार कोणाच्या मालिकीची आहे. अपघात कोणत्या कारणामुळे घडला. कार चालकाची स्थिती काय होती. यााबतचा तपशिल पोलीस जमा करत आहेत. या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.