Advertisement

वांद्रे-कुर्ला संकुलात युलु ई-बाईक सुविधा

मुंबईत प्रथमच अशा प्रकारची ई-बाईक शेअरिंग सुविधा उपलब्ध झाली आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलात युलु ई-बाईक सुविधा
SHARES

मुंबईतील वांद्रे (पू.) ते कुर्ला (प.) आणि वांद्रे-कुर्ला संकुलात 'युलु ई-बाईक' वापरून प्रवास करता येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि युलु बाईक यांच्या माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. सोमवारपासून ही प्रवासी सुविधा सुरू झाली असून, मुंबईत प्रथमच अशा प्रकारची ई-बाईक शेअरिंग सुविधा उपलब्ध झाली आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलात मोठ-मोठ्या कंपन्या असून याठिकाणी कर्मचारी वर्गाची प्रचंड गर्दी असते. अनेक चाकरमनी सकाळच्या सुमारास वांद्रे स्थानक पू. ते बीकेसी या मार्गावर प्रवास करतात. निश्चित वेळेत कामावर हजर राहण्यासाठी धक्काबुक्की सहन करावी लागते. त्यामुळं या प्रवाशांसाठी अनेक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशात आता 'युलु ई-बाईक' सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

'युलु ई-बाईक'नं प्रवास करण्यासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानकात बुकींग करावं लागणार आहे. त्यानंतर, अ‍ॅपवरून ई-बाईक स्थानकातून घेण्याची सुविधा असेल आणि बाईक जमा केल्यावर अ‍ॅपमधूनच भाड्याची रक्कम कापली जाणार आहे. यासाठी सुरुवातीला १९९ रुपये सुरक्षा अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तर युलु स्थानकावरून ई-बाईक घेण्याचा आकार ५ रुपये असून, प्रति मिनिट दीड रुपये आकार असणार आहे.



हेही वाचा -

बाप्पाच्या विसर्जनासाठी यंदा ४४५ विसर्जनस्थळं सज्ज

Unlock 4.0: ७ सप्टेंबरपासून मुंबई मेट्रो सुरू होणार, शाळा मात्र बंदच!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा