Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,79,051
Recovered:
57,33,215
Deaths:
1,18,313
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,637
521
Maharashtra
1,24,398
6,270

बाप्पाच्या विसर्जनासाठी यंदा ४४५ विसर्जनस्थळं सज्ज

मंगळवारी अनंत चतुर्दशी म्हणजे १० दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन असल्यानं महापालिका सज्ज झाली आहे.

बाप्पाच्या विसर्जनासाठी यंदा ४४५ विसर्जनस्थळं सज्ज
SHARES

दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असून, वाजत-गाजत बाप्पाला निरोप दिला जातो. परंतु, यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असल्यानं साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गर्दी टाळण्यासाठी आगमन, विसर्जन मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय, मंगळवारी अनंत चतुर्दशी म्हणजे १० दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन असल्यानं महापालिका सज्ज झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलाव, फिरत्या तलावांसह यंदा ४४५ विसर्जनस्थळे सज्ज ठेवण्यात आली आहे. 

बाप्पाच्या विसर्जनासाठी पालिकेचे सुमारे २३ हजार कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. विसर्जनावेळी नागरिकांनी सुरक्षित वावर, मास्‍क, सॅनिटायझरचा वापर, तसंच आरोग्‍याशी संबंधित नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्‍यात आलं आहे.

विसर्जनासाठी महापालिकेनं विभागांमध्ये कृत्रिम तलाव तयार केले आहेत. अधिकाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात किंवा घरच्या घरी, सोसायटीच्या आवारात करावं, असंही आवाहन महापालिकेनं केलं होतं. या आवाहनाला दीड ते ७ दिवसांच्या गणपतीत भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

विसर्जनाची तयारी

 • कृत्रिम तलाव १६८
 • मूर्तीसंकलन केंद्र १७०
 • फिरती विसर्जनस्थळे ३७
 • नैसर्गिक विसर्जनस्थळे ७०
 • एकूण विसर्जनस्थळे ४४५

विसर्जन स्थळावरील सुविधा

 • स्टील प्लेट ८९६
 • नियंत्रण कक्ष ७८
 • जीवरक्षक ६३६
 • मोटर बोट ६५
 • प्रथमोपचार केंद्र ६९
 • रुग्णवाहिका संख्या ६५
 • स्वागतकक्ष ८१
 • तात्पुरती शौचालये ८४
 • निर्माल्य कलश ३६८
 • निर्माल्य वाहन /डंपर/ टेम्पो ४६७
 • फ्लड लाइट २७१७
 • सर्च लाइट ८३
 • विद्युत व्यवस्था - आवश्यकतेनुसार
 • संरक्षण कठडे - आवश्यकतेनुसार
 • निरीक्षण मनोरे ४२
 • जर्मन तरफा ४५
 • कर्मचारी १९५०३
 • अधिकारी ३९६९

मूर्तीसंकलन केंद्र

महापालिकेच्‍या प्रत्‍येक विभागांतर्गत ७ ते ८ गणेशमूर्तींचे संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत. त्‍याची माहिती तसेच कृत्रिम तलावांची माहिती पत्त्यासह तसेच गुगल लोकेशनसह पालिकेच्‍या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.

सील इमारतीतील विसर्जन घरातच

सील केलेल्या इमारतींमधील गणेशमूर्तींचं विसर्जन घरीच करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्‍ये असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तींचं विसर्जन मंडपातच करावं किंवा विसर्जन पुढे ढकलावं.

आरती घरी/मंडपातच

मूर्तीसंकलन केंद्र, कृत्रिम तलाव किंवा नैसर्गिक विसर्जनस्‍थळांवर उपलब्‍ध पालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सुपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करून घेणं बंधनकारक आहे.

नैसर्गिक विसर्जनस्‍थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांना थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे. नैसर्गिक विसर्जनस्थळांपासून एक ते दोन किमी अंतरातील गणेशभक्तांनी आपल्या मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक विसर्जनस्थळी उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे आपल्या मूर्ती विसर्जनासाठी द्यावयाच्या आहेत.हेही वाचा -

'चाळसंस्कृती'मधील गणेशोत्सव!

Unlock 4.0: ७ सप्टेंबरपासून मुंबई मेट्रो सुरू होणार, शाळा मात्र बंदच!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा