Advertisement

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील इमारतीचा भाग कोसळला

क्रॉफर्ड मार्केटजवळील मंगलदास रोडवर लोहार चाळ येथील युसूफ इमारतीचा भाग कोसळला.

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील इमारतीचा भाग कोसळला
SHARES

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेल्या युसूफ इमारतीचा काहीसा भाग कोसळल्याची घटना घडली आहेमंगळवारी रात्रीच्या सुमारास इमारतीचा भाग कोसळला. या घटनेनंतर काही जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती येत होती. मात्र या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या १७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. यामधील काही जण किरकोळ जखमी असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

४ मजली इमारत

दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील क्रॉफर्ड मार्केटजवळील मंगलदास रोडवर लोहार चाळ येथील युसूफ इमारतीचा भाग कोसळला आहे. ही इमारत ४ मजली असून, या इमारतीच्या उत्तरेकडील काही भाग कोसळला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली.

बचावकार्य सुरू

या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीनं स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहेहेही वाचा -

Iphone 11 लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमतRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा