SHARE

जगभरातील मोबाइल युजरची पसंती असलेल्या Apple नं आपल्या कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो येथील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंटमध्ये iphone 11 सिरिजचे ३ फोन लॉन्च केले आहेत. अॅपलनं iphone 11, iphone 11 Pro आणि iphone 11 Pro Max हे फोन लॉन्च केले आहेत64 GB, 128 GB आणि 256 जीबी व्हेरिअंटमध्ये तिन्ही iphone उपलब्ध असणार आहेत.. iphone 11 च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत ६९९ डॉलर्स, iphone 11 Pro च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत ९९९ डॉलर्स, तर iphone 11 Pro Max च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत १,०९९ डॉलर्स आहेभारतात iphone सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात विक्रीकरीता उपलब्ध होणार आहे. भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या iphone 11 च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत ६४,९०० रूपये, iphone 11 Pro च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत ९९,९०० रूपये आणि iphone 11 Pro Max च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत १,०९,९०० रूपये असणार आहे.

iphone 11 चे फिचर्स 

iphone 11 मध्ये ६.१ इंचाचा LCD रेटिना डिस्प्ले आहे. याआधी लॉन्च करण्यात आलेल्या iphone XR प्रमाणेच हा फोन असणार आहे. या फोनमध्ये एक नॉचही देण्यात आली आहे. ६ कलर ऑप्शनसह हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये पर्पल, व्हाईट, ग्रीन, रेड, ब्लॅक आणि येल्लो कलर्स उपलब्ध असणार आहेत. यामध्ये १२ मेगापिक्सेलचे २ कॅमेरे देण्यात आले असून मेन कॅमेरा वाईड अँगल लेन्स तर दुसरा कॅमेरा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स असेल. यामध्येही नाईट मोड फिचर देण्यात आले आहे. यात नाईट मोड आपणहून सुरू होत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. तसंच 64 fps नं याद्वारे 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येणार आहे. iphone 11 मध्येही नवी A13 Bionic चीप देण्यात आली आहे.

phone 11 Pro आणि iphone 11 Max चे फिचर्स

iphone 11 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर iphone 11 Pro आणि iphone 11 Pro Max या दोन्ही मॉडेल्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणं यावर्षीही नवी Apple A13 Bionic ही चीप लॉन्च केली आहे. iphone 11 Pro मध्ये ५.८ इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर iphone 11 Pro Max मध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच या सर्व फोनमध्ये A13 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. आतापर्यंतच्या स्मार्टफोनमधील ही सर्वात वेगवान प्रोसेसर असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहेसर्व iphone ची प्री बुकींग १३ सप्टेंबरपासून सुरू होणार असून २७ सप्टेंबरपासून हे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

कसा असेल कॅमेरा?

iphone 11 Pro मध्ये कंपनीनं डीप फ्युजन कॅमेरा फिचर दिलं आहे. याचा वापर लो लाईट फोटोग्राफीसाठी करता येणार आहे. याआधी गुगलनं आपल्या फोनमध्ये दिलेल्या नाईट साईट फिचर प्रमाणेच हे फिचर काम करणार आहे. एकावेळी फोटो क्लिक करून मर्ज करण्याचे काम हे फिचर करतं. iphone 11 Pro 60fps नं 4K व्हिडीओ शूट करता येणार आहे. यामध्ये मेन कॅमेरा F 1.8 लेन्ससह 12 मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. तर दुसरा कॅमेरा F 2.4 लेन्सह अल्ट्रा वाईड आणि तिसरा १२ मेगापिक्सेलचा F 2.0 लेन्ससह झूम लेन्स कॅमेरा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त iphone 11 Pro मध्ये 4x ऑप्टिकल झूमदेखील देण्यात आले आहे.

अशी आहे बॅटरी
Apple
नं नव्या iPhone मध्ये बॅटरी लाईफ अधिक उत्तम केली आहे. iphone 11 Pro मध्ये iphone 11 XS च्या तुलनेत तास अधिक बॅटरी बॅकअप मिळणार आहे. iphone 11 Pro Max मध्ये iphone XS Max च्या तुलनेत ५ तास अधिक बॅटरी बॅकअप मिळणार आहे. हे दोन्ही फोन मिडनाईट ग्रीन, स्पेस ग्रे, सिल्व्हर/व्हाईट आणि गोल्ड कलरमध्ये मिळणार आहे.

Series 5 वॉच, iPad लॉन्च

Apple नं आपल्या iphone सोबत iWatch ची पाचवी सिरिज लॉन्च केली आहे. याच्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत ३९९ डॉलर्स निश्चित करण्यात आली आहे. तर iWatch सोबतच कंपनीनं नवा iPad देखील लॉन्च केला आहे. iPad ३२९ डॉलर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

यासह Apple TV Plus सबस्क्रीप्शन डॉलर्स प्रति महिना दरानं देण्यात येणार आहे. १०० पेक्षा अधिक देशांमध्ये ही सेवा उपल्बध असणार आहे. तसंच, अॅपल कंप्युटींग डिव्हाईस खरेदी करणाऱ्या युझर्सना एका वर्षाचं Apple TV Plus सबस्क्रीप्शन देण्यात येणार आहे.हेही वाचा -

कृपाशंकर सिंह यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, भाजपात प्रवेश करण्याची शक्यतासंबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ