Advertisement

कृपाशंकर सिंह यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, भाजपात प्रवेश करण्याची शक्यता


कृपाशंकर सिंह यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, भाजपात प्रवेश करण्याची शक्यता
SHARES

राज्यात काँग्रेसला एकापाठोपाठ मोठे हादरे बसत आहेत. मंगळवारी जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. तर दुपारनंतर  उर्मिला मातोंडकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खडगे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. कृपाशंकर सिंह भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

उत्तर भारतियांचा मुंबईतील एक मोठा नेता अशी कृपाशंकर सिंह यांची ओळख आहे. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत कलीना मतदारसंघातून पराभव पत्करावा लागल्यानंतर कृपाशंकर सिंह यांचा प्रभाव कमी होण्यास सुरूवात झाली. तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि उत्तर भारतीय नेते संजय निरुपम यांच्याशी त्यांचे मतभेद चांगलेच चर्चेत होते. 

कृपाशंकर सिंह आता भाजपामध्ये प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात आहे. कलिना विधानसभा मतदारसंघातून ते आपल्या पत्नीला उतरवण्याची शक्यता आहे. काही काळ ते राजकारणात सक्रीय नव्हते. मात्र, भाजपा नेत्यांशी ते अधूनमधून भेटीगाठी घेत होते. हेही वाचा -

उर्मिलाच्या राजीनाम्यामागे ‘हे’ कारण?

हर्षवर्धन पाटील अखेर भाजपात
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा