Advertisement

हर्षवर्धन पाटील अखेर भाजपात

इंदापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सोडत नसल्याने हर्षवर्धन पाटील नाराज होते. अनेक वर्ष इंदापूर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता.

हर्षवर्धन पाटील अखेर भाजपात
SHARES

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.  काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी दुपारी ३ वाजता मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करतील. 

राष्ट्रवादीकडून विश्वासघात

इंदापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सोडत नसल्याने हर्षवर्धन पाटील नाराज होते. अनेक वर्ष इंदापूर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ही जागा आपल्याला मिळाली अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार करून त्यांनी इंदापूरमधून मोठी आघाडी मिळवून दिली होती. यावेळी लोकसभेला आम्हाला मदत करा विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा सोडतो असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं होतं. मात्र, आता राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आपला विश्वासघात केल्याचे म्हणत आतापर्यंत आपण संयमाने वागलो. मात्र आता आपला आक्रमकपणा बघाच असा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी दिला होता. यावेळी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. 

१४ वर्ष मंत्रिपदावर 

इंदापूर विधानसभा मतदार संघांतून हर्षवर्धन पाटील ४ वेळा निवडून आले आहेत. सलग तीन वेळा अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले होते.  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्येही १४ वर्ष ते मंत्रिपदावर होते. तर याआधी युती सरकारच्या काळात ते मंत्रिपदावर होते. सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. 



हेही वाचा -

उर्मिला मातोंडकरची काँग्रेसला सोडचिठ्ठी

शेवटच्या कॅबिनेटमध्ये ३७ मोठे निर्णय, निवडणुका डोळ्यापुढे ठेवून निर्णयांचा धडाका





Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा