Advertisement

उर्मिला मातोंडकरची काँग्रेसला सोडचिठ्ठी

मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत उर्मिला काँग्रेसमधून बाहेर पडली. कुठल्या पक्षात जायचा याचा सध्यातरी निर्णय घेतला नसून आगामी वाटचालीचा निर्णय त्यावेळी घेतला जाईल, असं उर्मिलाने म्हटलं आहे.

उर्मिला मातोंडकरची काँग्रेसला सोडचिठ्ठी
SHARES

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसला आता सोडचिठ्ठी दिली आहे. मंगळवारी उर्मिलाने आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.  पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिलाने राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या आधी उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. प्रवेश करतानाच तिने काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळवली.  उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उर्मिलाने निवडणूक लढवली. मात्र तिचा पराभव झाला. 

मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत उर्मिला काँग्रेसमधून बाहेर पडली. कुठल्या पक्षात जायचा याचा सध्यातरी निर्णय घेतला नसून आगामी वाटचालीचा निर्णय त्यावेळी घेतला जाईल, असं उर्मिलाने म्हटलं आहे. हेही वाचा  -

शेवटच्या कॅबिनेटमध्ये ३७ मोठे निर्णय, निवडणुका डोळ्यापुढे ठेवून निर्णयांचा धडाका

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब?
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा