Advertisement

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब?

राज्यभरात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेतील युती कायम राहणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब?
SHARES

राज्यभरात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेतील युती कायम असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सोमवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा झाल्याचं समजतं. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती मिळते.

जागावाटप अंतिम टप्प्यात

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. तसंच, निवडणुकीसाठीच्या या महायुतीत शिवसेना, भाजपसह रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार विनायक मेटे यांची संघटना सहभागी होणार आहे. या पक्षांनी विधानसभेसाठी आपल्याला हव्या असलेल्या जागांची संख्या कळवली आहे. परंतु, शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपाच्या समीकरणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळं हा तिढा सुटल्यानंतरच छोट्या पक्षांसाठी किती आणि कोणत्या जागा सोडाव्यात हे निश्चित होणार आहे

क्षमतेनुसार जागा

विधानसभा निवडणुकीसाठी मित्र पक्षांनी कितीही जागा मागितल्या, तरी त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार जागा दिल्या जाणार असल्याची चर्चा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यात झाल्याचं समजतं. तसंच, ज्या जागा सोडणं शक्य आहे, त्या जागेबाबत कल्पना मित्र पक्षांना दिली जाणार आहे.

ऑक्टोबरमध्ये मतदान? 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते आणि १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान मतदान होणार असल्याचं महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. युतीच्या जागावाटपाचा निर्णय आठवडाभरात लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा -

सरकारी गृहनिर्माण योजनेतून आता एका व्यक्तीला एकच घर

मुंबईत पावसाचा नवा विक्रम, सप्टेंबरचा पाऊस १० वर्षांतील सर्वाधिकसंबंधित विषय
Advertisement