NCRB च्या रेकाॅर्डनुसार २० वर्षात २१२३ आरोपींचा पोलिसांच्या ताब्यात मृत्यू

पार्श्वभूमिवर दोन दशकात देशात २१२३ व्यक्तींचा पोलिसांच्या ताब्यात अथवा कोठडीत मृत्यू झाला आहे. त्यातील सुमारे १४२३ संशयीत आरोपींचा मृत्यू न्यायालयापुढे हजर करण्यापूर्वीच झाला आहे.

NCRB च्या रेकाॅर्डनुसार २० वर्षात २१२३ आरोपींचा पोलिसांच्या ताब्यात मृत्यू
SHARES

उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये ८ पोलिसांची हत्याकरून पळालेला गॅगस्टर विकास दुबे चकमकीत ठार झाला. त्यांच्या एन्काऊन्टरवरची घटना ही एका चित्रपटातील कथेस साजीशी अशी आहे. या घटनेच्या आधी तामिळनाडूत अलीकडेच तामिळनाडूत एक भयानक घटना घडली, ज्यात पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत पी. जयराज ( ५८) आणि जे. बेनिक्स (३१) या पितापुत्रांचा जीव गेला. त्यांचा अपराध काय? तर ‘लॉकडाऊन’च्या काळात त्यांनी त्यांचं मोबाईल विक्रीचं दुकान बंद करायला थोडासा उशीर केला. या घटनांच्या पार्श्वभूमिवर दोन दशकात देशात २१२३ व्यक्तींचा पोलिसांच्या ताब्यात अथवा कोठडीत मृत्यू झाला आहे.  त्यातील सुमारे १४२३ संशयीत आरोपींचा मृत्यू न्यायालयापुढे हजर करण्यापूर्वीच झाला आहे.

हेही वाचाः- उद्धवा! लाॅकडाऊन की अनलाॅक, काय ते ठरवा!!

उत्तर प्रदेश पलिसांचे पथक ३ जुलैला गँगस्टर  विकास दुबेला अटक करण्यासाठी कानपूर येथे गेले असता त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. या घटनेनंतर चौताळलेल्या पोलिसांनी विकास दुबेसह त्याच्या साथीदारांविरोधात शोध मोहिम राबवली. आरोपींची माहिती देणाऱ्यास प्रशासनाकडून लाखों रुपयांचे बक्षीस जाहिरे केले होते. विकासच्या तीन ते चार साथीदारांचा पोलिसांनी एन्काऊन्टर केला. मात्र विकास पोलिसांच्या हाथी लागत नव्हता. अशातच शुक्रवारी त्याला मध्यप्रदेशमधून ताब्यात घेण्यात आले. विकासला उत्तरप्रदेशमध्ये नेले जात असताना. पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. त्यावेळी विकासने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि विकास पोलिस एन्काऊन्टमध्ये मारला गेला. महाराष्ट्रातही जून २०१७ मध्ये कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये हिच्या हत्येनंतर देश हादरला होता. कारागृहातील पोलिसांनी कैदी मंजुळा शेट्येला अमानुष मारहाण केली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला होता. या सर्व घटनेनंतर कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या हत्याप्रकरणात सहा महिला पोलिसांना बडतर्फकरून त्यांना अटक ही करण्यात आली होती. पोलिसांच्या ताब्यात अथवा कोठडीत असताना आरोपीचा मृत्यू झाल्याचे हे काही पहिले प्रकरण नाही.

हेही वाचाः- ऐश्वर्या राय-बच्चन, आराध्या देखील COVID 19 पॉझिटिव्ह

राष्ट्रीय गुन्हे नोंदी विभागाच्या(एनसीआरबी) २०१८ पर्यंतच्या आकडेवारीचा विचार केल्यास गेल्या दोन दशकात देशांत २१२३ आरोपींचा पोलिसांच्या ताब्यात अथवा कोठडीत मृत्यू झाला आहे. त्यातील सुमारे ७०० आरोपींना मृत्यू पोलिस कोठडीत आरोपीची रवानगी करण्यात आल्यानंतर झाला आहे. त्यातील १०१७ प्रकरणांमुळे पुढे गुन्हे दाखल झाले. तर ११०६ प्रकरणांमध्ये मृत्यू नैसर्गिक असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. राज्याचा विचार केला, तर महाराष्ट्रात २२५ व्यक्तींचा मृत्यू पोलिसांत्या ताब्यात अथवा कोठडीत झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदी विभागाच्या(एनसीआरबी) आकडेवारीतून निष्पन्न झाले आहेत. २०१४ ते २०१८ या वर्षांचा विचार केल्यास राज्यात ७८ व्यक्तींचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता.  २००५ पासून कोठडीतील मृत्यूची न्यायालयीन चौकशी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. २००४ मधील मुंबईतील ख्वाजा युनुस या संशयीत आरोपीचे मृत्यूप्रकरण खूप वादात सापडले होते. तसेच डिसेंबर, २०१९ मध्ये  हैद्राबाद येथील सामुहिक बलात्कार व हत्येतील ४ आरोपींही पोलिसांच्या ताब्यातून पलायन करण्याच्या प्रयत्नात मारले गेले होते. हैद्राबादमधील चकमक व दुबेसोबत पोलिसांची चकमक दोनही घटना सकाळीच्या वेळेत झाल्या आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा