पत्रकार महिलेला अश्लील मेसेज, आरोपी गजाआड

महिलेची नणंद 2018 मध्ये लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावर एका तरुणासोबत ओळख झाली होती. दोघांनीही व्हॉट्सअॅप क्रमांक एकमेकांना दिल्यानंतर त्या तरुणाने अश्लील संदेश पाठवण्यात सुरूवात केली.

पत्रकार महिलेला अश्लील मेसेज, आरोपी गजाआड
SHARES

मुंबईतल्या एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या पत्रकार महिलेच्या नावाने बनावट ट्वीटर अकाउंट तयार करून त्याद्वारे तिची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलिसांनी कैलास यादव या ४५ वर्षीय व्यक्तीला ओडीसातून अटक केली आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलिस अधिक तपास करत आहेत. 

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे ११७९ नवे रुग्ण, ३२ जणांचा दिवसभरात मृत्यू

राष्ट्रीय वृत्तवाहिनी पत्रकार म्हणून कार्यरत असलेली ३२ वर्षीय महिलेची नणंद हिने २०१८ मध्ये लग्न जुळवणाऱ्या संकेत स्थळावर आपले नाव नोंदवल होते. त्या संकेतस्थळावर तिची कैलास याच्याशी ओळख झाली. अल्पावधीतच दोघांनी एकमेकांना आपला नंबर शेअर केला. मात्र  कैलासचे काही निर्णय न पटल्यामुळे तरुणीने पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. हीबाब खटकल्याने कैलासने महिलेला फोनवर अश्लील मेसेज पाठवण्यास सुरूवात केली. हा प्रकार तिने तक्रारदार महिलेला सांगितल्यानंतर तिने या तरुणाला समज दिली. त्यानंतर तक्रारदार महिलेला २०१९ मध्ये अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून अश्लील संदेश पाठवण्यात आले. तिने पुन्हा त्या तरुणाला समज दिली असता त्याने संदेश पाठवणे बंद केले.

हेही वाचाः-भरधाव कारने ४ जणांना चिरडले, क्रॉफर्ड मार्केट येथील घटना

दरम्यान यावर्षी जुलै महिन्यात तक्रारदार महिलेच्या नावाने बनावट ट्वीटर अकाउंट बनवण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले. त्यात तक्रारदार महिलेचे छायाचित्र वापरण्यात आले होते. तसेच काही आक्षेपार्ह संदेशही त्या ट्वीटरवरून अपलोड करण्यात आले होते. अखेर महिलेने याप्रकरणी मलबार हिल पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ३५४ (ड) सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६६ (क) व ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कैलास यादवला उडिसातून अटक केली. आरोपी कोणतेही कामधंदा करत नसून विवाहीत आहे. त्याची पत्नी उडीसातील रेल्वे सुरक्षा दलात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वीही आरोपीने अशा पद्धतीने कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता का, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा