Advertisement

मलबार हिल, नाना चौकमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ

मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर आता १ टक्क्यांच्या खाली आला आहे. मात्र मुंबईतील काही विभागात रुग्णवाढीचा दर अधिक आहे.

मलबार हिल, नाना चौकमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. मात्र, बोरिवली, कांदिवलीत रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहे. आता डी विभागातील ग्रॅंटरोड, नाना चौक, मलबार हिलमध्येही रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा मोठा आहे.

मागील आठवडय़ापासून बोरिवलीला मागे टाकत ग्रॅंटरोड, नानाचौक, मलबार हिलमध्ये रोज सरासरी ७० नवीन रुग्ण आढळत आहेत. डी विभागात आढळणारे रुग्ण हे उच्चभ्रू वसाहतीतील इमारतीत राहणारे आहेत. पेडररोड येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील एका घरातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

मुंबईतील रुग्णांची संख्या कमी होत आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर आता १ टक्क्यांच्या खाली आला आहे. मात्र मुंबईतील काही विभागात रुग्णवाढीचा दर अधिक आहे.  बोरिवलीत रुग्णवाढीचा दर १.५ टक्के तर कांदिवलीत १.३ टक्के आहे. डी विभागातील  मलबार हिल, पेडर रोड, नाना चौक आणि मुंबई सेंट्रल येथे रुग्णवाढीचा दर १.७ टक्के आहे. संपूर्ण मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७५ दिवसांचा आहे. मात्र, या भागात रुग्णदुपटीचा कालावधी ४१ दिवस आहे.

डी विभागातील रुग्णांची एकूण संख्या ४२२९ वर गेली आहे. या ठिकाणी आता सक्रिय रुग्ण ८२७ आहेत. मागील आठवड्यात मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत १० दिवसात ३६ रुग्ण आढळले. त्यामुळे ही संपूर्ण सोसायटी सील करण्यात आली.


हेही वाचा

शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स या तारखेपासून उघडणार

Electricity Bill: सर्वसामान्यांना वीज बिलात सवलत? सरकार ‘अशा’ पद्धतीने करतंय विचार



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा