तीन दिवसांच्या चौकशीनंतर अखेर रिया चक्रवर्तीला अटक

मागील दोन दिवसांपासून रियाची एनसीबीकडून चौकशी सुरू होती. या पूर्वी या प्रकरणात तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि सुशांत सावंत याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे.

तीन दिवसांच्या चौकशीनंतर अखेर रिया चक्रवर्तीला अटक
SHARES

अभिनेता सुशांतसिंह राजपूतला अंमली पदार्थ पुरवल्याच्या आरोपाखाली ३ दिवस चौकशी केल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने मंगळवारी अटक केली. मागील दोन दिवसांपासून रियाची एनसीबीकडून चौकशी सुरू होती. या पूर्वी या प्रकरणात तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि सुशांत सावंत याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे.  

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात जेव्हापासून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने उडी घेतली आहे. तेव्हापासून या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहे. एनसीबीने अनेक लोकांची चौकशी आतापर्यंत केली. रविवारपासून रिया चक्रवर्तीचीही या प्रकरणी चौकशी करण्यात आली. रविवारी साधारणपणे सात तासाच्या चौकशीनंतर एनसीबीच्या टीमने रियाला दुसऱ्या दिवशी सोमवारीही चौकशीसाठी बोलावलं. त्यानंतर मंगळवारीही रिया चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात सकाळी १० च्या सुमारास हजर राहिली. रियाची काल केलेल्या चौकशीत तिने अंमली पदार्थ स्वतः घेणं, विकत घेणं, हातात घेणं याबद्दस स्पष्ट नकार दिला. नारकोटिक्सलाही रियाला अटक करण्यापूर्वी पक्के पुरावे जमा करायचे आहेत. यावरच तिला न्यायालयात उभं केलं जाऊ शकतं याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मंगळवारी रिया चक्रवर्तीला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले.चौकशी दरम्यान रियाचा सहभाग निश्चित झाल्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली आहे. रियाला मेडिकल टेस्टसाठी नेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एनसीबी ऑफिसच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्टसाठी नेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

हेही वाचाः- बेकायदेशीर बांधकामप्रकरणी कंगना रणौतला बीएमसीची नोटीस

एनसीबीने रियाच्य घरातून तिचा जुना मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब अशा गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत.एनसीबीच्या टीमने सुरुवातीला रियाच्या अटकेचा मेमो तयार केला. अटकेचा मेमो तयार झाल्यावर तिला वैद्यकीय चाचणीसाठी नेलं जाईल. सध्या ती एनसीबी पथकाच्या ताब्यात आहे. असं सांगितलं जात आहे की, आता कागपत्रांची जुळवाजुळ सुरू आहे आणि त्यानंतर रियाची सरकारी इस्पितळात मेडिकल आणि कोरोना टेस्ट केली जाईल. एनसीबीच्या कार्यालयात रियासाठी तात्पुरते लॉकअप करण्यात आलं आहे. न्यायालयात नेईपर्यंत रियाला तिथेच ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचाः- १०हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील - महापालिका

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा