छताला टेकू लावून रुग्णांवर उपचार, सायन हॉस्पिटलची धक्कादायक परिस्थिती

Sion
छताला टेकू लावून रुग्णांवर उपचार, सायन हॉस्पिटलची धक्कादायक परिस्थिती
छताला टेकू लावून रुग्णांवर उपचार, सायन हॉस्पिटलची धक्कादायक परिस्थिती
See all
मुंबई  -  

मुंबईतल्या अनेक धोकादायक इमारतींना टेकू लावलेले असते. याच टेकू लावलेल्या इमारतींमध्ये अनेक कुटुंबीय जीव मुठीत धरुन राहतात. आता रुग्णालयातही टेकूखाली घाबरत उपचार घेण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. हे रुग्णालय दुसरे तिसरे कोणतेही नसून महापालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयांपैकी एक असलेले लोकमान्य टिळक रुग्णालय म्हणजेच शीव रुग्णालय आहे!


हे देखील वाचा -

केईएम, शीव, नायरमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर


शीव येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 32 मधील स्लॅबचा भाग कोसळून धोकादायक झाल्यामुळे याच्या दुरुस्तीचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. परंतु, या रुग्णालयाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. काम सुरू असलेल्या आणि टेकू लावलेल्या भागातच रुग्णांवर उपचार केले जात असल्याची बाब समोर आली आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृहनेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समिती अध्यक्ष बाळा नर आणि आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे यांच्यासमवेत शीव रुग्णालयातील कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना टेकू लावलेल्या वॉर्डातच रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे आढळून आले. भिंतींना तडे, तसेच कोणत्याही क्षणी स्लॅब कोसळू शकते, असे चित्र पाहायला मिळाले असून रुग्णांना दिलेल्या बेडशिट्सही फाटक्या असल्याचे दिसून आले. त्यामुळे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.हे देखील वाचा -

महापालिकेच्या रुग्णालयांत फक्त मुंबईकरांनाच वैद्यकीय उपचारात सवलत?


शीव रुग्णालयामध्ये मागील अनेक वर्षांपासून रुग्णांची गैरसोय होत आहे. मागील अनेक महिन्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली धोकादायक विभागांमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे याप्रकरणी भविष्यात अन्य कुणाकडून आवाज उठवण्यापूर्वीच शिवसेनेने याची पाहणी करुन प्रशासनाला फैलावर घेऊन कंत्राटदारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, येथील रुग्णांची संख्या आणि तेथील वर्दळ लक्षात घेता कंत्राटदाराने हे काम त्वरीत पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे अजूनही काही महिने काम पूर्ण होणार नसून रुग्णांना या ठिकाणीच जीव मुठीत धरून उपचार घ्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

आम्ही जेव्हा पाहणी केली, तेव्हा टेकू लावलेल्या वॉर्डात रुग्ण दिसून आले. ही बाब अतिशय गंभीर आहे. ज्या कंत्राटदारांनी कामाला विलंब केला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना दिली आहे. तसेच, दुरुस्ती सुरू असलेल्या विभागात रुग्णांना ठेऊ नये, अशाही सूचना दिली आहे.
- यशवंत जाधव, सभागृहनेते, मुंबई महापालिका


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.