Advertisement

बेकायदेशीर बांधकामप्रकरणी कंगना रणौतला बीएमसीची नोटीस

खार पश्चिम येथील कार्यालयात बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे.

बेकायदेशीर बांधकामप्रकरणी कंगना रणौतला बीएमसीची नोटीस
SHARES
खार पश्चिम येथील कार्यालयात बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. या नोटिसीला २४ तासांत उत्तर देण्यास कंगनाला सांगण्यात आलं आहे. खार पश्चिममध्ये पाली हिल परिसरात कंगनाचं कार्यालय आहे. या कार्यालयात बेकायदेशीर बदल करून बांधकाम केल्याचा आरोप महापालिकेने केला आहे. कंगनाने नोटिसीला उत्तर न दिल्यास बेकायदेशीर बांधकाम पाडलं जाईल. असं पालिकेने नोटीसमध्ये म्हटलं आहे.

नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीएमसीने कंगनाच्या कार्यालयाबाहेर मंगळवारी नोटीस लावली आहे. या नोटीसमध्ये सात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. त्यानुसार इमारतीचं बांधकाम पालिकेच्या नियमांनुसार न झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचं बांधकाम अनधिकृत असल्याचं म्हटलं आहे. या नोटीसचे काही फोटो कंगनाने ट्विटरवरदेखील शेअर केले आहेत.

सोमवारी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयाची पाहणी केली. मुंबई महापालिकेच्या नियमानुसार हे कार्यालय बांधलेलं आहे का? याचा आढावा यावेळी मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला. यासंदर्भात माहिती देताना कंगनानं पालिका अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. कंगना म्हणाली की, माझ्या घरात ते जबरदस्ती घुसले आणि सर्व पाहणी करू लागले. त्यांनी माझ्या शेजारच्यांना देखील त्रास दिला. याशिवाय त्यांची भाषा अशी होती की, वोह जो मॅडम है उसकी करतूत का परिणाम सबको भरना होगा.


कंगनानं आपल्या ट्विटसोबत एक व्हिडिओ देखील जाहीर केला आहे. तसंच मी कुठल्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम केलं नसल्याचं देखील तिनं स्पष्ट केलं आहे. कंगनाने म्हटलं की, माझ्याकडे सर्व कागदपत्रं आहेत, पालिकेच्या परवानग्या आहेत. माझ्या मालमत्तेत काहीही बेकायदा झालेलं नाही. बेकायदेशीर बांधकामांना नोटीस देऊन दर्शवण्यासाठी स्ट्रक्चर योजना पाठवावी.



हेही वाचा -  

पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कंगनाच्या कार्यालयाची पाहणी

कंगना मुंबईत आली की तिला... महापौरांनी दिले संकेत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा