कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी २६८ नवीन रुग्णांची नोंद

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मंगळवारी नवीन २६८ कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर ९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

मागील काही दिवसांपासून कल्याण - डोंबिवलीत रोज ५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. मात्र, मंगळवारी रुग्णांची संख्या निम्म्याने घटल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे.  मंगळवारी  ३८१ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडलं आहे. कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत १० हजार ४२८ रुग्ण हे उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.

 नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कल्याण (पू) ४२, कल्याण (प)  ६७, डोंबिवली (पू)  १०१, डोंबिवली (प)  ४७, मांडा-टिटवाळा  ५, मोहना  ५, पिसवलीतील एका रुग्णाचा समावेश आहे.  कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या ५९१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  


हेही वाचा -

‘कोविड’ संशयित मृत्यू म्हणजे नेमकं काय?, नितेश राणेंचा बीएमसीला प्रश्न

महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी


पुढील बातमी
इतर बातम्या