मुंबई महानगर क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णसंख्येत कल्याण-डोंबिवली महापालिका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात रोज ११०० ते १२०० रुग्ण आढळून येत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या २० दिवसांपासून रोज ४५० ते ५५० रुग्ण आढळून येत आहेत. तर ठाणे महापालिका क्षेत्रात रोज ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत आहे. ठाण्यापेक्षा कल्याण-डोंबिवलीत रुग्ण वाढीचा वेग जास्त आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १७ हजार ६४० वर गेली आहे. यापैकी ९ हजार ३०७ रुग्ण २ ते १९ जुलै या कालावधीतील आहेत. तर, ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १६ हजार ८९४ इतके रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये करोना रुग्ण संख्येत कल्याण-डोंबिवली दुसऱ्या स्थानावर असल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा -
‘कोविड’ संशयित मृत्यू म्हणजे नेमकं काय?, नितेश राणेंचा बीएमसीला प्रश्न
महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी