राज्यात २७ हजार ९१८ कोरोनाचे नवे रुग्ण,१३९ रूग्णांचा मृत्यू

राज्यात मंगळवारी कोरोनाचे २७ हजार ९१८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १३९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत ५४ हजार ४२२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के आहे.  

मंगळवारी २३ हजार ८२० रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २३,७७,१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८५.७१ टक्के झालं आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९६,२५,०६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,७३,४३६ (१४.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,५६,६९७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १७ हजार ६४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाख ४० हजार ५४२ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५७६९४ इतके रुग्ण आहेत. तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून  ४५३३० झाला आहे. मुंबई पालिका हद्दीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४७७४२ आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या ३७५१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या २८९७९ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या २८१८, औरंगाबादमध्ये २०५२५, जळगावमध्ये ६५६५, अहमदनगरमध्ये ८११७  तर कोल्हापुरात ६६६ इतकी आहे. 

हेही वाचा -

  1. लोकांचा निर्धास्तपणा ‘याला’ कारणीभूत- राजेश टोपे
  1. मास्क न घातल्यास आता ५०० रुपये दंड

पुढील बातमी
इतर बातम्या