जी दक्षिण वॉर्ड बनला सर्वात जास्त धोकादायक, रुग्णांची संख्या 308 वर

राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबईत आहे. दिवसेंदिवस मुंबईतील रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. मुंबईतला जी दक्षिण हा वॉर्ड सर्वात जास्त धोकादायक बनला आहे. मागील 12 तासांत जी दक्षिण वॉर्डमध्ये 28 नवे रुग्ण सापडले आहेत. या वॉर्डमधील कोरोना रुग्णांची संख्या आता 308 वर गेली आहे. जी दक्षिण या वॉर्डमध्ये वरळी, प्रभादेवी, एलफिन्स्टन हे उच्चभ्रू आणि झोपडपट्टी असलेले विभाग येतात.


ई वॉर्डमधील रुग्णसंख्या 125 वर गेली आहे. या ठिकाणी 5 रुग्ण वाढले आहे.  ई वॉर्डमध्ये भायखळा विभाग येतो. तर डी वॉर्ड म्हणजे ग्रांट रोडमधील कोरोना रुग्णांची संख्या 107 वर गेली आहे. या विभागात नवीन 10 रुग्ण सापडले आहेत. धारावीमध्ये मंगळवारी आणखी नवे 6 रुग्ण आढळले आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता  55 वर पोहोचली आहे. धारावीतील जवळपास पंधरा हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यामधून 90 लोकांचे नमुने घेण्यात आले. त्याच्यामध्ये सर्दी ताप खोकला अशी लक्षणं आढळली आहेत. या 90 लोकांचे मंगळवारी तपासणी अहवाल येण्याची शक्यता आहे. या 90 जणांपैकी 50 ते 60 जण जर पॉझिटिव्ह झाले तर  धारावीमध्ये कम्युनिटी स्प्रेड अर्थात समूह संसर्ग झाला असं म्हणू शकतो.  जर असा अहवाल आला नाहीतर ही आरोग्य प्रशासनासाठी ही दिलासादायक बाब ठरेल.


हेही वाचा -

भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन - नरेंद्र मोदी

मार्च, एप्रिलचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ


पुढील बातमी
इतर बातम्या