Advertisement

मार्च, एप्रिलचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ

लाॅकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. वीज बिल भरणा केंद्रेही बंद आहेत. त्यामुळे अनेकांना वीजबिलही भरता आलं नाही.

मार्च, एप्रिलचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ
SHARES

लाॅकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. वीज बिल भरणा केंद्रेही बंद आहेत. त्यामुळे अनेकांना वीजबिलही भरता आलं नाही. मात्र, आता सरकारने वीजग्राहकांना दिलासा दिला आहे. वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी दिले आहेत.

महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक यासह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.  महावितरणच्या वीज ग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वतः रिडींग घेऊन महावितरणच्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपद्वारे अपलोड करावेत, असं आवाहनही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलं आहे. मार्च महिन्याचं बिल भरण्याची मुदत १५ मे तर एप्रिल महिन्याचं वीजबिल भरण्याची मुदत ३१ मे करण्यात आली आहे. यामुळे महावितरणच्या वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महावितरणने २३ मार्चपासून वीज ग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणे बंद केले आहे. वीजबिलांची छपाई व वितरणदेखील बंद करण्यात आले आहे. तसंच वीज बिल भरणा केंद्रेही बंद आहेत. परंतु, महावितरणच्या कन्झुमर पोर्टलवरून किंवा मोबाइल अॅपमधील लॉगइनद्वारे वीज ग्राहकांना मीटरचे रीडिंग अपलोड करण्याची सोय आहे. महावितरणच्या ग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन (सेल्फ मीटर रीडिंग) पाठवावे असा 'एसएमएस' मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या राज्यातील २ कोटी १० लाखांपेक्षा अधिक वीजग्राहकांना पाठविण्यात येत आहे, असं महावितरणनं सांगितलं आहे. 



हेही वाचा -

भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन - नरेंद्र मोदी

प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्माची अंधश्रद्धेतूनच आत्महत्या, मिञाविरोधात गुन्हा दाखल




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा