Advertisement

भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन - नरेंद्र मोदी

भारतात मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन - नरेंद्र मोदी
SHARES

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी १० वाजता देशातील जनतेला संबोधित करत भारतातील लॉकडाऊनचा कालावधीत वाढ केल्याती घोषणा केली. भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे.

२१ दिवसांच्या लॉकडाऊनचा आज अखेरचा दिवस असून, देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. कोरोना हॉटस्पॉट वाढले नाही तर नियम शिथील करण्यात येतील, असा दिलासाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिला आहे.

२० एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाचं मूल्यांकन केलं जाणार आहे. जे प्रदेश करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील तिथले नियम शिथील केले जातील, असंही त्यांनी म्हटलं. आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज देशातील कोरोनाबाधितांची संख्या १०३६३ वर पोहचली आहे. यामध्ये ७६ परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा