कल्याण डोंबिवलीत २८६ नवीन रुग्ण, ९ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी कोरोनाचे नवीन २८६ रुग्ण आढळले.  तर ९ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४६,८९९ झाली आहे. यामध्ये ३००२ रुग्ण उपचार घेत असून ४२,९७५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ५१, कल्याण प ६७, डोंबिवली पूर्व ७६, डोंबिवली प ७४,  मांडा टिटवाळा १७, तर मोहना येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ४९ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ३ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ७ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  १ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ४ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा -

NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान

MPSC ची नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलली


पुढील बातमी
इतर बातम्या