'त्याने' मरणानंतर वाचवले तिघांचे प्राण

एका तेवीस वर्षीय तरुणाच्या अवयवदानामुळे तीन जणांना जीवनदान मिळालं आहे. या तरुणाला तीव्र सेरेब्रल इन्फर्क्ट आणि मायोकार्डियल इन्फेक्शन झाल्याने डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केलं. दरम्यान त्या मृत तरुणाच्या पालकांनी त्याच्या अवयवदानाचा निर्णय घेत तिघांचे प्रण वाचवले आहे.

१७ जुलैपासून होते उपचार सुरू

मुंबईतील एका 23 वर्षीय तरुण १७ जुलैला पी. डी हिंदुजा रुग्णालयात तीव्र सेरेब्रल इन्फर्क्ट आणि तीव्र मायोकार्डियल इन्फेक्शन या आजाराच्या उपचारासाठी दाखल झाला होता. उपचारादरम्यान तरुणाला ब्रेनडेड घोषित केलं.

पालकांनी केलं अवयवदान

मुलाच्या मृत्यूचं दुःख न मानता पालकांनी त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्या तरुणाचं यकृत आणि किडनी दान करण्यात आली आहे. एक किडनी हिंदुज रुग्णालयात तर दुसरी ज्युपिटर रुग्णालयात दान करण्यात आली आहे. तर युवकाचं यकृत हे फोर्टीस रुग्णालयात दान करण्यात आलं आहे.

अवयवदानाचे महत्व जाणता त्यांनी हा निर्णय घेतला असून हे आदरास्पद असल्याचं पी डी हिंदुजा रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. 


हेही वाचा - 

कोकिलाबेन रुग्णालयात अवयवदान, तिघांना‌ जीवदान

अवयवांसाठी अॅपच्या माध्यमातून करा नोंदणी

पुढील बातमी
इतर बातम्या