Advertisement

कोकिलाबेन रुग्णालयात अवयवदान, तिघांना‌ जीवदान

४५ वर्षीय एक महिला अचानक ब्रेनडेड झाल्याने कुटुंबियांनी रुग्णालयाच्या अवयवदान समन्वयकांच्या समुपदेशनानंतर अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांचं अवयवदान करण्यात आलं.

कोकिलाबेन रुग्णालयात अवयवदान, तिघांना‌ जीवदान
SHARES

सध्या अवयवदानाबाबत जनजागृतीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. ७ एप्रिलला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात झालेल्या अवयवदानामुळे ३ जणांना जीवदान मिळालं.

४५ वर्षीय एक महिला अचानक ब्रेनडेड झाल्याने कुटुंबियांनी रुग्णालयाच्या अवयवदान समन्वयकांच्या समुपदेशनानंतर अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांचं अवयवदान करण्यात आलं.


किडनी दान

या महिलेचं यकृत ग्लोबल रुग्णालयात पाठवण्यात आलं. तर, एक किडनी अवयवदान झालेल्या रुग्णालयात म्हणजेच कोकिलाबेनमध्येच देण्यात आली. तर, दुसरी जसलोक रुग्णालयात दान करण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे अनेक वर्षांपासून अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तिघांना नव्याने आयु्ष्य मिळालं.

रत्नागिरीच्या ४५ वर्षीय ताराबाई (नाव बदललेलं) यांना गेल्या काही महिन्यांपासून हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्यावर औषधोपचार सुद्धा सुरु होते. पण, त्यांना अचानक तीव्र डोकेदुखी जाणवू लागल्याने डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात दाखल केलं.


यकृत आणि किडनी दान

कोकिलाबेन रुग्णालयात ताराबाई यांच्यावर उपचार सुरू होते. पण, मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं. त्यानंतर डॉक्टरांनी नातेवाईकांकडे अवयवदान करण्याची परवानगी मागितली. कुटुंबियांनीही अवयवदानाचं महत्त्व समजून अवयवदान करण्याची संमती दिली.

अवयवदानाची परवानगी मिळताच डॉक्टरांनी विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती(झेडटीसीसी)ला माहिती दिली. त्यानुसार ताराबाई यांचं यकृत आणि किडनी दान करण्यात आली आहेत.


अचानक ब्रेन हेमरेज झाल्यानं कुटुंबियांनी त्यांना उपचारांसाठी मुंबईत आणलं. उपचारांना प्रतिसाद देत नसल्यानं आणि डोक्यात रक्तस्त्राव होऊ लागल्यानं डॉक्टरांनी ८ एप्रिलला रात्री २.३० त्यांना वाजता ब्रेनडेड घोषीत केलं. रुग्ण ब्रेनडेड असल्याचं नातेवाईकांना सांगितलं. त्यांच्या नातेवाईकांनीही चांगला सपोर्ट केला.
- डॉ. रेखा बारोत, अवयवदान प्रत्यारोपण समन्वयक, कोकिलाबेन रुग्णालय



हेही वाचा-

दहावीच्या पुस्तकात अवयवदानाचाही समावेश

जागतिक आरोग्य दिवस: नाहीतर, छोटे आजार होतील मोठे!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा