Advertisement

६.५ किलो वजनाच्या बाळावर यकृत प्रत्यारोपण

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये गंभीर परिस्थितीत असणाऱ्या एक वर्षांच्या बाळावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. यकृताचं प्रत्यारोपण फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलं. महाराष्ट्रात लहान मुलांच्या यकृत प्रत्यारोपणामध्ये ६.५ किलो एवढ्या वजनाची ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचं अपोलो रुग्णालयाने सांगितलं. या बाळाच्या मावशीने शस्त्रक्रियेसाठी यकृताचा एक भाग दान केला.

६.५ किलो वजनाच्या बाळावर यकृत प्रत्यारोपण
SHARES

अपोलो हॉस्पिटलमध्ये एक वर्षांच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यामुळे ६.५ किलोग्रॅम एवढंच वजन असलेल्या बाळाला जीवदान मिळालं.

मावशीने दिलं यकृत

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये गंभीर परिस्थितीत असणाऱ्या एक वर्षांच्या बाळावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. यकृताचं प्रत्यारोपण फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलं. महाराष्ट्रात लहान मुलांच्या यकृत प्रत्यारोपणामध्ये ६.५ किलो एवढ्या वजनाची ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचं अपोलो रुग्णालयाने सांगितलं. या बाळाच्या मावशीने शस्त्रक्रियेसाठी यकृताचा एक भाग दान केला.

एनजीओची मदत

राम मिस्त्री असं या बाळाचं नाव असून त्याला शेवटच्या स्तरावरील यकृताच्या आजाराचं निदान झालं होतं. ज्याला बिलीअरी एट्रेसिया असंही म्हणतात. मिस्त्री हे गुजरातमध्ये राहणारे आहेत. आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने बाळाच्या प्रत्यारोपणाचा खर्च करणं त्यांच्यासाठी कठीण होतं. पण, त्यांनी 'ट्रान्सप्लांट' नावाच्या एनजीओसोबत संपर्क साधल्यावर शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च जमा झाला. त्यानंतर अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने रामवर यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शस्त्रक्रियेविषयी अधिक माहिती देताना अपोलो हॉस्पिटलचे लिव्हर ट्रान्सप्लान्ट विभागचे प्रमुख, दारियस मिर्झा यांनी सांगितलं की, बिलीअरी एट्रेसिया हा लहान मुलांमध्ये आढळणारा एक दुर्मिळ आजार आहे. ज्यात बाळावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्यात ही फक्त ४० टक्के लोकांना केलेल्या शस्त्रक्रियेमुळे फरक पडतो. या केसमध्ये जीव वाचवण्यासाठी प्रत्यारोपणाची गरज खूप लवकर होती. बाळाच्या मावशीने पुढाकार घेतल्यामुळे आम्ही त्याच्यावर यकृत प्रत्यारोपण करु शकलो.

हेही वाचा-

प्रसूतीनंतर १८ महिन्यांनी 'तिने' उघडले डोळे

मुंबईत २.७२ करोड व्यक्तींना ऑटिझम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा