Advertisement

प्रसूतीनंतर १८ महिन्यांनी 'तिने' उघडले डोळे

तब्बल १८ महिन्यांनी भावेशाला शुद्ध आली आहे. तिने डॉक्टरांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. तिने हळूहळू डोळे उघडले आहेत. पूर्णपणे कोमातून बाहेर येण्यासाठी तिला आणखी ३ ते ४ महिने लागणार आहेत.

प्रसूतीनंतर १८ महिन्यांनी 'तिने' उघडले डोळे
SHARES

प्रसूती दरम्यान कोमात गेलेल्या ३६ वर्षीय भावेशाला मुंबईतील जसलोक रुग्णालयाने जीवदान देत तिच्यात जगण्याची नवी उमेद निर्माण केली आहे. डाॅक्टरांनी भावेशावर नुकतीच 'डिप ब्रेन स्टिम्युलेशन' ची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर भावेशाने १८ महिन्यानंतर डोळे उघडले आहेत.

भावेशा अजूनही पूर्णपणे कोमातून बाहेर आलेली नाही. ती हालचालही करू शकत नाही. पण, गुरूवारी शस्त्रक्रियेनंतर भावेशाने पहिल्यांदाच डोळे उघडले. ज्यामुळे तिच्यात जगण्याची नवी उमेद दिसून आल्याचं जसलोक रुग्णालयातील डॉक्टर आणि तिच्या कुटुंबीयांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.


'अशी' गेली कोमात

जसलोक रूग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट विभागाचे प्रमुख डॉ. परेश दोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेशाला प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर तिला मुलुंडच्या एका मॅटर्निटी होममध्ये दाखल करण्यात आलं. पण, प्रसूती दरम्यान भावेशाचा रक्तदाब कमी झाला. त्यातही तिने दोन बाळांना सुखरूप जन्म दिला.

तिची 'सी सेक्शन' प्रसूती झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह झाला होता. तेव्हाच ती कोमात गेली. मॅटर्निटी होममध्ये उपकरणे नसल्याने तिला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिच्यावर महिनाभर उपचार सुरू होते. तिथे व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. पण, तरीही प्रकृतीत सुधारणा झाली नाही.


शस्त्रक्रियेआधीच प्रतिसाद

थोडा काळ असाच गेला. त्यानंतर पुन्हा एकदा तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेत जसलोक रुग्णालयाशी संपर्क साधला. सल्लामसलत करुन डॉक्टर आणि कुटुंबीयांच्या सहकार्याने तिच्यावर 'डिप ब्रेन स्टिम्युलेशन' शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेआधीच तिने न्यूरोफिजिओलॉजिकल टेस्टला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. त्यानंतर ३ एप्रिलला तिच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

तब्बल १८ महिन्यांनी भावेशाला शुद्ध आली आहे. तिने डॉक्टरांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. तिने हळूहळू डोळे उघडले आहेत. पूर्णपणे कोमातून बाहेर येण्यासाठी तिला आणखी ३ ते ४ महिने लागणार आहेत. 

तर, डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेबाबत भावेशाचे पती निखील घोसरानी यांनी आभार मानले आहेत.



हेही वाचा-

बाळाला जन्म दिल्यानंतर ९ दिवसांत आईचा डेंग्यूमुळे मृत्यू

इच्छामरणाचा ऐतिहासिक निर्णय, पण 'या' अटींवरच!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा