Advertisement

बाळाला जन्म दिल्यानंतर ९ दिवसांत आईचा डेंग्यूमुळे मृत्यू


बाळाला जन्म दिल्यानंतर ९ दिवसांत आईचा डेंग्यूमुळे मृत्यू
SHARES

बाळाला १६ ऑक्टोबरला जन्म दिल्यानंतर कोमात गेलेल्या मातेची अखेर मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली आहे़. बाळाला जन्म दिल्यानंतर दिपा मौर्य डेंग्यूशी झुंज देत होत्या. पण, मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये दीपा मौर्य यांचा मृत्यू झाला.  

दीपा सुरूवातीला भांडुपमधील श्रेणिक रुग्णालयात दाखल होत्या. तिथे त्यांनी बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. श्रेणिक रुग्णालयातील डॉक्टरांना दीपा यांना डेंग्यू झाल्याचं निदान करता आलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ते उपचार न झाल्याने त्यांची प्रकृती खालावली.


बाळालाही झाला डेंग्यू 

दिपाने जन्म दिलेल्या बाळालाही जन्मत: डेंग्यू झाला. हे बाळ अत्यंत नाजूक अवस्थेत असून ते देखील मृत्यूशी झुंज देत होतं. या बाळावर दुसऱ्या रुग्णालयात 'एनआयसीयू'त उपचार सुरू आहेत. फक्त ९ दिवसांच्या या बाळाचे प्लेटलेट्स २ लाखांऐवजी ७४ हजार झाले होते. ज्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक झाली होती. या बाळाला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं, मंगळवारी हा व्हेंटीलेटर काढण्यात आला. त्याची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.


योग्यवेळी उपचार नाही

दिपा यांचा मृत्यू डेंग्यूमुळे नाही, तर श्रेणिक रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्यवेळी उपचार न केल्यामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या‌ कुटुंबीयांनी केला आहे.


जोपर्यंत श्रेणिक रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही तिचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. आम्ही डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी भांडुप पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो. पण तिकडे तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळे आता मुलुंड डीसीपी पोलीस स्टेशनमध्ये आलो आहोत. पण, इथेही पोलीस दाद देत नाहीत.
- शितल मौर्य, दिपा मौर्य यांची बहीण



हेही वाचा - 

फक्त 15 दिवसांत मुंबईत डेंग्यूचे 1,963 रुग्ण!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा