Advertisement

1 ते 15 सप्टेंबरपर्यंत डेंग्यूचे 164 रुग्ण, तिघांचा मृत्यू


1 ते 15 सप्टेंबरपर्यंत डेंग्यूचे 164 रुग्ण, तिघांचा मृत्यू
SHARES

वातावरणातील बदलामुळे सध्या मुंबईवर आजारांचे सावट आहे. त्यात साथीच्या रोगांमध्ये दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. सर्दी, ताप, खोकला आणि अंगदुखी या आजारांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासोबतच डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढझाली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यातील 15 दिवसांत डेंग्यूचे 164 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय फक्त 15 दिवसांत डेंग्यूचे 1 हजार 659 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्याआधी फक्त 11 दिवसांत डेंग्यूचे 102 रुग्ण आढळून आले होते. म्हणजेच फक्त 4 दिवसांत डेंग्यूचे 62 नवे रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यांत डेंग्यूचे 293 रुग्ण आढळून आले होते. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता.

जुहूतल्या 9 वर्षाच्या मुलाचा 10 सप्टेंबरला डेंग्यूमुळे मृत्यू झाला. त्याच दिवशी धारावीतील दीड वर्षीय चिमुरडीचाही डेंग्यूने जीव घेतला. वांद्रे येथील 34 वर्षांच्या तरुणाचा 5 सप्टेंबरला डेंग्यूमुळे मृत्यू झाला.

सध्या डेंग्यूची लक्षणे ओळखता येत नसल्याने उपचार जरी सुरू असले तरी डेंग्यूचा आजार कमी होत नसल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे. त्यासाठी रुग्णांनी आणि मुंबईकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन वारंवार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.


लेप्टोने दोघांचा मृत्यू

लेप्टोनेही घाटकोपर येथील 19 वर्षाच्या तरुणाचा 6 सप्टेंबरला आणि अंधेरीतील 27 वर्षाच्या तरुणाचा 15 सप्टेंबला मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार 

घाटकोपर आणि अंधेरी भागात करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत 1 हजार 260 घरांना भेटी देण्यात आल्या. त्यात 5 हजार 760 लोकांची तपासणी करण्यात आली. यात 7 जणांना ताप, 9 जणांना कफ तर 4 डायरियाचे रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

उंदीर शोधण्यासाठी 128 घरांना भेटी देऊन 110 बिळांमध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकले आहे. तर वांद्रे, जुहू आणि धारावी परिसरात 1 हजार 653 घरांना भेटी देत 7 हजार 195 लोकांची तपासणी केली आहे. त्यात 12 लोकांना ताप, 7 जणांना कफ आणि 3 डायरियाचे रुग्ण आढळले.


डेग्यूंची लक्षणे खालीलप्रमाणे 

• अचानक ताप येणे
• डोकेदुखी, सांधेदुखी किंवा पाठदुखी
• उलट्या होणे
• त्वचेवर चट्टे उठणे किंवा ओरखडे उठणे
• डोळ्यांची जळजळ होणे
• रक्तातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होणे


हेही वाचा - 

११ दिवसांत डेंग्यूचे १०२, मलेरियाचे २१७ रुग्ण

डेग्यू, मलेरियांच्या खटल्यांसाठी १०० खासगी वकिलांची फौज!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा